Video : आर अश्विनने शाकिब अल हसनला मारलेला षटकार पाहिलात का? बघा काय टायमिंग आहे ते

| Updated on: Sep 19, 2024 | 5:28 PM

बांगलादेशविरुद्ध भारताची नाजुक स्थिती असताना आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने कमाल केली. खऱ्या अर्थाने बांगलादेशला प्रश्नपत्रिकेत अभ्यास न केलेला प्रश्न आला असं म्हणायला हरकत नाही. लोकल बॉय आर अश्विनने तर बांगलादेशी गोलंदाजांची पिसं काढली. त्याने शाकीब अल हसनला मारलेला षटकार पाहून तुम्हीही आवाक् व्हाल.

Video : आर अश्विनने शाकिब अल हसनला मारलेला षटकार पाहिलात का? बघा काय टायमिंग आहे ते
Image Credit source: BCCI
Follow us on

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्वीन आणि रवींद्र जडेजाने लाज राखली. कारण 144 धावांवर 6 विकेट अशी स्थिती असताना भारतीय क्रीडारसिकांनी सर्वच आशा सोडून दिल्या होत्या. इतकंच काय तर पाकिस्तानसारखी स्थिती होते की अशी भीतीही लागून होती. पण आर अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने कमाल केली. सातव्या विकेटसाठी 190 हून अधिक धावांची भागीदारी केली. तसेच आर अश्विनने कसोटीतील सहावं शतक ठोकलं. आर अश्विनने 108 चेंडूत शतक ठोकलं. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले. अर्धशतक तर त्याने 12 चेंडूतच पूर्ण केलं असं म्हणायला हरकतन नाही. शतकी खेळीवेळी त्याचा स्ट्राईक रेट 92.59 चा होता. आर अश्विनच्या कारकिर्दीतील हे सर्वात वेगवान शतक आहे. अश्विनच्या आक्रमक खेळीमुळे बांगलादेशचे गोलंदाज दडपणाखाली आहे. नेमका कुठे चेंड टाकावा हेच कळत नव्हतं. बांगलादेशने गोलंदाजीच्या भात्यातील सर्व शस्त्र आर अश्विनला बाद करण्यासाठी वापरली. पण तिथपर्यंत भारताचं धावांचं संकट टळलं होतं.

शाकिब अल हसनवर तर आर अश्विन आणि रवींद्र जडेजा तुटून पडले होते. संघाचं 53 वं षटक टाकण्यासाठी शाकीब अल हसन आला होता. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर जागेवरून स्टँडमध्ये षटकार मारला. मिडविकेटवरून मारलेला हा षटकार पाहून सर्वच आवाक् झाले. 80.7 किमी प्रतितास वेगाने टाकलेल्या चेंडूवर केलेला प्रहार इतका जोरदार होता की मैदानात दूर दूरपर्यंत आवाज गेला. त्याच्या या षटकाराचं विश्लेषण करताना समालोचकाने मागेपुढे पाहिले.आर अश्विनच्या या शॉटचं त्याने कौतुक केलं.

आर अश्विनचं हे होमग्राउंड आहे आणि त्यांना आपल्या खेळीने सर्वांचं जीव भांड्यात पडला. आर अश्विनने त्याच्या कसोटी क्रिकेट कारकिर्दितलं हे सहावं शतक ठोकलं आहे. तसेच त्याच्या कारकिर्दितील वेगाने ठोकलेलं शतक ठरलं आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असून भारताने 6 गडी बाद 339 धावा केल्या आहेत. आर अश्विन नाबाद 102, तर रवींद्र जडेजा नाबाद 86 धावांवर आहेत.