‘Ind vs Ban मॅचमध्ये अंपायरलाच…’; ‘त्या’ वाईड बॉलबाबत हरभजन सिंहचं मोठं वक्तव्य!

| Updated on: Oct 20, 2023 | 10:14 PM

Harbhajan Singh on ind vs ban match : बांगलादेशच्या खेळाडूने टाकलेला वाईड बॉल अंपायरने नसल्याचं सांगितलं. या निर्णयाची सर्व क्रिकेट जगतात चर्चा होत असताना यावर माजी खेळाडू हरभजन सिंह याने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Ind vs Ban मॅचमध्ये अंपायरलाच...; त्या वाईड बॉलबाबत हरभजन सिंहचं मोठं वक्तव्य!
Follow us on

मुंबई : भारत आणि बांगलादेशमध्ये झालेल्या सामन्यात भारताने सात विकेटने विजय मिळवला. या सामन्यात स्टार खेळाडू विराट कोहली याने कडक शतकी खेळी केली. कोहलीचं शतक पाहण्यासाठी कित्येकांनी देवाला प्रार्थना केली. मात्र मैदानावरील अंपायरच्यारही मनात तसंच काहीसं होतं हे त्यांनी दिलेल्या एका निर्णयातून दिसलं. बांगलादेशच्या खेळाडूने टाकलेला वाईड बॉल अंपायरने नसल्याचं सांगितलं. या निर्णयाची सर्व क्रिकेट जगतात चर्चा होत असताना यावर माजी खेळाडू हरभजन सिंह याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला हरभजन सिंह?

मला वाटतं तो खरच वाईड बॉल होता पण हे सोडा कारण कोहलीने शानदार फलंदाजी केली. त्यामुळे फक्त भारतीय चाहत्यांचीच नाहीतर अंपायरचीही इच्छा होती की कोहलीचं शतक व्हावं. हेसुद्धा कारण असू शकतं, असं हरभजन सिंह याने म्हटलं आहे. कोहलीनेसुद्धा चांगली बॅटींग केली आणि दमदार शतक केल्याचंही भज्जी म्हणाला.

विराट कोहली याने बांगलादेशविरूद्ध शतक करत अनेक विक्रम रचले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीने 26,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशी कामगिरी तो जगातील चौथा फलंदाज असून अवघ्या 567 डावांमध्ये विराटने ही कामगिरी केली होती. सचिन तेंडुलकर याने 600 डावांमध्ये 26,000 धावा पूर्ण केल्या होत्या.

दरम्यान, भारत आणि बांगलादेश सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना 256 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहली याने सर्वाधिक 103 धावांची खेळी केली होती. त्यासोबतच शुबमन गिल यानेही 53 धावांची अर्धशतकी खेळी केली.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद,  नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम