पुणे | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील चौथा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील चौथा सामना हा बांगलादेश विरुद्ध होणार आहे. टीम इंडियाने याआधीच्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे टीम इंडियाचा विश्वास दुप्पट आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेश आहे. बांगलादेशने 3 पैकी फक्त 1 मॅच जिंकली आहे. टीम इंडियाच्या तुलनेत बांगलादेश निश्चित कमजोर आहे. मात्र त्यांना गृहीत धरण्याची चुक रोहितसेना करणार नाही. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना कधी होणार, कुठे पाहता येणार, हे सर्वकाही जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना गुरुवारी 19 ऑक्टोबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना हा पुण्यातील गहुंजेच्या एमसीए स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामन्याला दुपारी 2 वाजता सुरुवात होईल. तर 1 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना टीव्हीवर डीडी नेटवर्कवर फुकटात पाहता येईल. तसेच स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरही पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामना मोबाईलवर डिज्नी प्लस हॉटस्टार एपवर फ्रीमध्ये पाहता येईल.
आयसीसी वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.
बांगलादेश टीम | शकिब अल हसन (कॅप्टन), लिटॉन कुमेर दास, तन्झिद हसन तमीम, नजमुल हुसेन शांतो (विकेटकीपर), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमुदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराझ, नसुम अहमद, शाक महेदी हसन, तस्किन रहमान, मुस्तफीर रहमान , हसन महमूद , शोरीफुल इस्लाम आणि तनझिम हसन साकीब.