पुणे | टीम इंडियाने पाकिस्तान क्रिकेट टीमवर आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये शानदार विजय मिळवला. टीम इंडियाचा हा वर्ल्ड कपमधील सलग तिसरा विजय ठरला. तसेच पाकिस्तानला टीम इंडियाकडून वनडे वर्ल्ड कपमध्ये सलग आठव्यांदा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्याचं आयोजन शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. या हायव्होल्टेज सामन्याला भारतीय समर्थकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तर त्या तुलनेत पाकिस्तानचे चाहते हे नगण्य होते. पाकिस्तानने टीम इंडिया विरुद्धच्या पराभवानंतर नेहमीप्रमाणे रडरड करत बहाणेबाजी सुरु केली.
टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यात भारतीय चाहत्यांनी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळाडूंना वाईट वागणूक दिली. सामन्यादरम्यान पाकिस्तानच्या खेळाडूंवर जोरदार टीका करण्यात आली, असा आरोप पीसीबीचा आहे. तसेच पीसीबीने याबाबत तक्रार केली. पाकिस्तान टीम डायरेक्टर मिकी आर्थर यांनी सामन्यानंतर रडीचा डाव केला. “आम्हाला (पाकिस्तान) कुठूनही सपोर्ट मिळाला नाही. ही आयसीसीची स्पर्धा कमी आणि बीसीसीआय आयोजित स्पर्धा वाटत होती.”, अशी टीका करत आम्हाला एकटं पाडल्याचा आरोप आर्थर यांनी बीसीसीआयवर केला.
पीसीबीने केलेल्या या तक्रारीवरुन आयसीसीनेही पाकिस्तानला झापलं. आता हा विषय सोशल मीडियावर गाजतोय. टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सामन्यादरम्यान कॉमेंटेटर जतिन सप्रू याने सहकारी आणि माजी क्रिकेटर इरफान पठाण याला याबाबत काही प्रश्न केले. इरफानने यावर प्रतिक्रिया देताना धक्कादायक खुलासा केलाय.
पाकिस्तानचे खेळाडू ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करत आहेत ते योग्य आहे असं वाटतं का? असा प्रश्न जतिनने इरफानला विचारलं. जतिनच्या प्रश्नावर इरफान म्हणाला की, “नक्कीच नाही. त्यांना त्यांच्या खेळाकडे लक्ष द्यायला हवं. इतर गोष्टींकडे त्यांनी दुर्लक्ष करायला हवं. आपल्याला आणखी चांगली कामगिरी कशी करता येईल, याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवं.”, असं इरफान म्हणाला आणि पुढे त्याने धक्कादायक खुलासा केला.
इरफान पठाण काय म्हणाला?
Irfan Pathan on an incident while playing in Pakistan :
“One person from the crowd threw an iron nail at me, and it hit me right under my eye. It could be dangerous, but we didn’t make a fuss about it. We only appreciated their hospitality.” #INDvBAN
https://t.co/8NDSLQvcL7— GAUTAM (@indiantweetrian) October 19, 2023
पाकिस्तानच्या वागणुकीच्या मुद्दाला हात घालत इरफानने चांगलंच धारेवर धरलं आणि कानउघडणी केली. इरफानने क्रिकेट खेळताना पाकिस्तानमध्ये मिळालेल्या वागणुकीचा आणि झालेल्या एका घटनेचा खुलासा केला. “आम्ही पाकिस्तानमध्ये खेळायला गेलो होतो.तेव्हा पेशावरमध्ये एकाने माझ्यावर खिळ्ल्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर 10 मिनिटांसाठी खेळ थांबवण्यात आला होता.” असं इरफान कॉमेंट्री दरम्यान म्हणाला.