IND W vs BAN W : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, शर्मा-वर्मा जोडीसमोर बागंलादेशची शरणागती

| Updated on: Jul 11, 2023 | 6:54 PM

सामना बांगलादेशच्या पारड्यात होता मात्र दोघींनी संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. भारतीय संघाचा डाव 95 धावांवर आटोपला होता. मात्र बांगलादेशला 87 धावांवर रोखत सामना खिशात घातला.

IND W vs BAN W : टीम इंडियाचा सलग दुसरा विजय, शर्मा-वर्मा जोडीसमोर बागंलादेशची शरणागती
Follow us on

मुंबई : भारत आणि बांगलादेशमधील यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात 8 धावांनी विजय मिळवला आहे. दीप्ती शर्मा आणि शफाली वर्मा यांनी घेतलेल्या 3-3 विकेटच्या जोरावर महिला भारतीय संघाने सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. सामना बांगलादेशच्या पारड्यात होता मात्र दोघींनी संघाच्या विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. भारतीय संघाचा डाव 95 धावांवर आटोपला होता. मात्र बांगलादेशला 87 धावांवर रोखत सामना खिशात घातला.

नाणेफेक जिंकत टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीला उतरलेल्या शफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी झकास सुरूवात केली होती कारण 33 धावांवर पहिली विकेट गेली. त्यानंतर पत्त्याच्या बंगल्यासारखा टीम इंडियाचा डाव गडगडला. सुलताना खातून हिने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर भारताकडून स्मृती मानधनाने सर्वाधिक 19 धावा आणि शफाली वर्माने 13 धावा केल्या.

टीम इंडिया 95 धावांवर ऑल आऊट झाल्याने बांगलादेश हा सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. बांगलदेशचीही सुरूवात काही चांगली झाली नाही, मात्र एकवेळ 86-6 विकेट अशा चांगल्या अवस्थेत असताना बांगलदेशचा संघाच्या चार विकेट गेल्या.

 

आक्रमक खेळाडू शफाली वर्माने 3 विकेट्स घेत सामना फिरवला.  कारण तळाच्या फलंजांना तिने भोपळाही फोडू न देता माघारी पाठवलं. या विजयासह टीम इंडियाने ही मालि का जिंकली असून 2-0 झाली आहे. आता अंतिम सामन्यातही विजय मिळवत बांगलादेशला व्हाईटवॉश दिला आहे.

बांगलादेश महिला (प्लेइंग इलेव्हन): शथी रानी, शमीमा सुलताना, शोभना मोस्तारी, निगार सुलताना (W/C), शोर्ना अक्‍टर, रितू मोनी, नाहिदा अक्‍टर, फहिमा खातून, मारुफा अक्‍टर, सुलताना खातून, राबेया खान

भारतीय महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (C), यास्तिका भाटिया (W), हरलीन देओल, पूजा वस्त्राकर, दीप्ती शर्मा, अमनजोत कौर, बरेड्डी अनुषा, मिन्नू मणी