मुंबई : भारत आणि बांगलादेशमधील सामन्यामध्ये भारतीय संघाने सात विकेटने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने वर्ल्डकपमध्ये सलग चौथा विजय मिळवला आहे. बांगलादेश संघाच्या 257 धावांचा पाठलाग करताना भारताकडून विराट कोहली याने नाबाद 103 धावांची शतकी खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. याआधी सर्व गोलंदाजांनी दर्जेदार गोलंदाजी करत बांगलादेशचा डाव 250 च्या जवळपास गुंडाळला होता. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहने शेवटच्या ओव्हरमध्ये बांगलादेशचा मुख्य फलंदाज असलेल्या खेळाडूला कडक यॉर्कर टाकत आऊट केलं.
बांगलादेश संघाचे मुख्य फलंदाज बाद झाल्यावर महमुदुल्ला याने एकट्याने एक बाजू लावून धरली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये महमुदुल्ला बुमराहरला कसा डिफेंड करतो हे पाहायचं होतं. मात्र बुमराहने दुसऱ्याच चेंडूवर त्याच्या दांड्या उखडून टाकल्या. बांगलादेशविरुद्ध त्याने 10 ओव्हरमध्ये 41 धावा देत दोन विकेट घेतल्या.
दरम्यान, आतापर्यंत बुमराहने चार सामन्यांनध्ये एकूण 10 विकेट्स घेतल्या आहेत. यामधील ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन तर अफगाणिस्तानविरूद्ध चार आणि पाकिस्तानविरूद्धही दोन विकेट त्याने घेतल्या होत्या. बुमराह एक दोन विकेट घेत असला तरी तो धावांवर अंकुश आणि विरोधी संघाच्या खेळाडूंवर चांगला दबाव टाकतो.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास, तन्झिद, नजमुल हुसेन शांतो (C), मेहदी हसन मिराझ, तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (Wk), महमुदुल्ला, नसुम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम