आयपीएलच्या 17 व्या हंगामानंतर आता टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मोठ्या उत्साहात 2 जूनपासून क्रिकेटमधील सर्वात मोठ्या स्पर्धेपैकी एक असलेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचा श्रीगणेशा होणार आहे. त्याआधी स्पर्धेच्या पूर्वसंध्येला अखेरचा आणि टीम इंडियाचा पहिला सराव सामना होणार आहे. वर्ल्ड कपच्या मुख्य स्पर्धेआधी सहभागी 20 संघामध्ये 15 सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार, 15 वा आणि अखेरचा सामना हा टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश असा रंगणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामना हा आज 1 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामना हा न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळतील.
टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश सराव सामना मोबाईलवर डिज्नी-प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), जाकेर अली (विकेटकीपर), लिटॉन दास, सौम्य सरकार, तॉहीद हृदोय, शाकिब अल हसन, महमुदुल्ला, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तन्झिद हसन, तन्झिम हसन साकी आणि तन्वीर इस्लाम.