रिशद होसेनने मारला षटकार, विराट कोहलीला बॉल आणण्यासाठी असं करावं लागलं Watch Video

| Updated on: Jun 22, 2024 | 11:32 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या सुपर 8 फेरीतील सामन्यात भारताने बांग्लादेशला धावांनी नमवलं. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 196 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र हे आव्हान बांग्लादेशला काही गाठता आलं नाही. यासह बांगलादेशचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. पण या सामन्यात एक मजेशीर प्रकार घडला.

रिशद होसेनने मारला षटकार, विराट कोहलीला बॉल आणण्यासाठी असं करावं लागलं Watch Video
Image Credit source: Twitter
Follow us on

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. भारताविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर बांग्लादेशचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी 196 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बांग्लादेशला 20 षटकात 8 गडी गमवून 146 धावा करता आल्या. भारताने बांगलादेशवर 50 धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत आपलं स्थान आणखी मजबूत केलं आहे. भारताचे 4 गुण असून नेट रनरेटही चांगला आहे. असं असताना या सामन्यातील एक प्रकार चांगलाच चर्चेत आला आहे. क्रिकेट विश्वातील दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली बॉल आणण्यासाठी विचित्र वेळ आली. बॉल मैदानात लावलेल्या टेबलखाली गेला. मात्र तो चेंडू काढण्यासाठी कोणीच नसल्याने विराट कोहलीवर अशी वेळ ओढावली. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी त्याचा हा व्हिडीओ शेअर करत मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

कर्णधार रोहित शर्माने 18वं षटक फिरकीपटू अक्षर पटेलच्या हाती सोपवलं होतं. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रिशद होसेनने उत्तुंग षटकार मारला. हा षटकार मारलेला चेंडू मैदानात लावलेल्या टेबलाखाली गेला. मात्र तो चेंडू टेबलाखाली जाऊन काढण्याशिवाय पर्याय नव्हता. मग काय स्टारडम बाजूला सोडून विराट कोहलीला गली क्रिकेटची आठवण झाली आणि टेबलाखाली जाऊन बॉल काढून आणला. त्याचा हा अंदाज पाहून नेटकरीही खूश झाले आहेत.

विराट कोहली गेल्या काही सामन्यांपासून सूर मिळवण्यासाठी चाचपडत आहे. मात्र बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला काही अंशी यश आलं. त्याने 28 चेंडूत 37 धावांची खेळी केली. यात त्याने 3 षटकार आणि 1 चौकार मारला. आता भारताचा पुढचा सामना 24 जूनला ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यात आता भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. तसेच विराट कोहलीच्या खेळीकडेही लक्ष असेल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

बांग्लादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शकीब अल हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेदी हसन, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह