टीम इंडिया-बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि कसोटी सामना हा 27 सप्टेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. हा सामना कानपूरमधील ग्रीन पार्क येथे होणार आहे. भारताने पहिला सामना हा चौथ्या दिवशी 280 धावांनी जिंकला. टीम इंडयाच्या या विजयात कॅप्टन रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली हे दोघे अपयशी ठरले. दोघांना त्यांच्याच लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.त्याचाच फटका रोहित आणि विराटला बसला आहे. दोघांना आयसीसी कसोटी क्रमवारीत फटका बसला आहे. विराट कोहली टेस्ट रँकिंगमधील पहिल्या 10 फलंदाजांमधून बाहेर पडला आहे. तर शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या टीम इंडियाच्या युवा फलंदाजांनी झेप घेतली आहे.
या क्रमवारीतील पहिल्या 4 फलंदाजांनी आपलं स्थान कायम राखलंय. इंग्लंडचा अनुभवी फलंदाजा जो रुट अव्वल स्थानी कायम आहे. रुटच्या खात्यात 899 रेटिंग आहेत. दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा केन विलियमसन आहे. केनचे 852 रेटिंग आहेत. तर न्यूझीलंडचा डॅरेल मिचेल तिसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ चौथ्या स्थानी विराजमान आहे. या चौघांनी आपलं स्थान यशस्वरित्या कायम ठेवलंय.
यशस्वी जयस्वाल याने एका स्थानाची झेप घेतली आहे. यशस्वी पाचव्या स्थानी पोहचला आहे. यशस्वीने बांग्लादेश विरुद्ध पहिल्या कसोटीत अर्धशतकी खेळी केली होती. यशस्वीला त्याचाच फायदा झाला आहे. तर कमबॅकनंतर शतक ठोकणारा ऋषभ पंत सहाव्या स्थानी पोहचला आहे. यशस्वी आणि ऋषभ या पॉइंट्स हे 751 आणि 731 असे आहेत. दोघांमधील एका स्थानात 20 रेटिंगचं अंतर आहे.
युवा जोडीला फायदा, ‘रोकोला’ फटका
Indian batters in ICC Test ranking:
– Yashasvi Jaiswal 5th.
– Rishabh Pant 6th.
– Rohit Sharma 10th.
– Virat Kohli 12th.
– Shubman Gill 14th.5 INDIAN BATTERS IN TOP 20 🤯 pic.twitter.com/XR3hvV7Vok
— Johns. (@CricCrazyJohns) September 25, 2024
दरम्यान रोहितची एका झटक्यात 5 स्थानांनी घसरण झाली आहे. रोहित 716 रेटिंगससह दहाव्या स्थानी फेकला गेला आहे. विराट कोहली याला पाकिस्तानच्या बाबर आझमने मागे टाकलंय. विराटची सातव्या क्रमांकावरुन 12 व्या स्थानी घसरण झाली आहे. विराटची रेटिंग 709 इतकी आहे. तर बाबर आझम 712 रेटिंगसह 11 व्या क्रमांकावर आहे. तर शुबमन गिल याने 5 स्थानांची झेप घेत 701 रेटिंगसह 14 व्या क्रमांकावर पोहचला आहे.