मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत टीम इंडिया 12 वर्षांचा दुष्काळ संपवणार का? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडला आहे. दुसरीकडे, टीम इंडियाची विजयी वाटचाल सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या चार पैकी चार सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. बांगलादेश विरुद्धचा सामना टीम इंडियाने सहज जिंकला. बांगलादेशने 50 षटकात 8 गडी गमवून 256 धावा केल्या आणि विजयासाठी 257 धावांचं आव्हान दिलं. टीम इंडियाने हे आव्हान 7 गडी राखून 41.3 षटकात पूर्ण केलं. पण या सामन्याची चर्चा अजूनही रंगलेली आहे. मग ते विराट कोहलीचं शतक असो, वाइड बॉल असो की रोहित शर्माचा चुकीचा फटका. आता कर्णधार रोहित शर्मा याने शार्दुल ठाकुरबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. शुबमन गिल याने शार्दुल ठाकुरबाबत एक प्रश्न विचारला. त्यावर रोहित शर्मान प्लान काय होता? आणि कसा फिस्कटला याबाबत सांगितलं आहे.
शुबमन गिलने विचारलं की, केएल राहुलच्या जागी शार्दुल ठाकुरला फलंदाजीला पाठवणार होता? त्याचं काय झालं? त्यावर रोहित शर्मा याने उत्तर दिलं की, “त्याच चेंडूवर तो आउट झाला. त्याच चेंडूवर मी शार्दुलला सांगितलं होतं की तू जाशील आता. पण त्याच चेंडूवर श्रेयस अय्यर बाद झाला.” मग शुबमन गिलने सांगितलं यामुळे फॅन्स नाराज झाले, त्याचे हिटिंग वगैरे बघता आले नाही. तेव्हा रोहित शर्मा म्हणाला की, ‘शार्दुल ठाकुर मोठ्या मॅचचा प्लेयर आहे. तुम्हाला नक्कीच त्याला बघायला मिळेल.’
Dressing room banter 😉
Shardul Thakur's potential batting promotion 👌
Mohd. Siraj's celebration 😎Presenting post-match shenanigans ft. Shubman Gill 👌👌 – By @28anand
WATCH 🎥🔽 #CWC23 | #TeamIndia | #INDvBANhttps://t.co/Uzq6h9VLYs
— BCCI (@BCCI) October 20, 2023
रोहित शर्मा आणि शुबमन गिल याने पहिल्या गड्यासाठी 88 धावांची भागीदारी केली. पण हसन महमुदच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारताना बाद झाला. 48 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर संघाच्या 132 धावा असताना शुबमन गिल 53 धावा करून बाद झाला. त्यानंतर मैदानात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांची जोडी जमली दोघांनी 46 धावांची भागीदारी केली होती. 30 वं षटक सुरु होणार होतं, तेव्हाच त्याने शार्दुलला सांगितलं तयार राहा. पण पहिल्याच चेंडूवर श्रेयस बाद झाला. मग केएल राहुलला पाठवावं लागलं.
हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाल्याने पाचव्या गोलंदाजाची जबाबदारी शार्दुल ठाकरुलच्या खांद्यावर पडली. त्याने 9 षटकात 59 धावा देत 1 गडी बाद केला.