IND vs BAN 1st T20i: इंडिया-बांगलादेश पहिला सामना कुठे पाहता येणार?

| Updated on: Oct 05, 2024 | 6:10 PM

Pakistan vs England 1st Test : पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यात 7 ऑक्टोबरपासून मुल्तान येथे पहिला कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. इंग्लंडने या सामन्यासाठी 2 दिवसांआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे.

IND vs BAN 1st T20i: इंडिया-बांगलादेश पहिला सामना कुठे पाहता येणार?
india vs bangladesh
Follow us on

टीम इंडिया-बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकेनंतर आता एकूण 3 सामन्यांची टी 20i सीरिज खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव या मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर नजमुल हुसेन शांतो याच्याकडे बांगलादेशच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडने या मालिकेसाठी पूर्ण तयारी केली आहे. तर बांगलादेशही पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहे. मालिकेतील सलामीचा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार? किती वाजता सुरुवात होणार? हे आपण जाणून घेऊयात.

इंडिया-बांगलादेश पहिला टी 20i सामना केव्हा?

इंडिया-बांगलादेश पहिला टी 20i सामना रविवारी 6 ऑक्टोबरला खेळवण्यात येणार आहे.

इंडिया-बांगलादेश पहिला टी 20i सामना कुठे?

इंडिया-बांगलादेश पहिला टी 20i सामना माधवराव शिंदे क्रिकेट स्टेडियम, ग्वाल्हेर येथे आयोजित करण्यात आला आहे.

इंडिया-बांगलादेश पहिल्या टी 20i सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

इंडिया-बांगलादेश पहिल्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

इंडिया-बांगलादेश पहिल्या टी 20i सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

इंडिया-बांगलादेश पहिल्या टी 20i सामना टीव्हीवर स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.

इंडिया-बांगलादेश पहिल्या टी 20i सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

इंडिया-बांगलादेश पहिल्या टी 20i सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर पाहायला मिळेल.

टीम इंडियाचा पहिल्या सामन्यासाठी जोरदार सराव

बांगलादेश विरूद्धच्या टी 20I मालिकेसाठी टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.

टी 20i मालिकेसाठी बांगलादेश टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, तंजीद हसन, परवेज होसैन इमोन, तॉहीद हृदॉय, झाकेर अली, महेदी हसन, रिशाद होसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब, रकीबुल हसन आणि महमुदुल्लाह.