टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यानंतर आता थेट सप्टेंबर महिन्यात मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. बांगलादेश कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. उभयसंघात 2 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान चेन्नईत आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरा सामना हा 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कानपूर येथे होणार आहे.त्याआधीच टीम इंडियातील एका मुंबईकर खेळाडूची पोलखोल झाली आहे. कॅप्टन रोहित शर्माचा खास भिडू असलेल्या या खेळाडूने बॅटिंगने निराशा केली आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित त्याच्या भिडूला बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेतून वगळू शकतो.
टीम इंडियाचे खेळाडू सध्या बुची बाबू स्पर्धेत खेळत आहेत. बांगलादेश विरूद्धच्या मालिकेसाठी खेळाडूंना या स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. निवड समितीचंही या स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे लक्ष अहे. मात्र श्रेयस अय्यरने टीम इंडियात कमबॅकची संधी गमावली आहे. श्रेयसने बूची बाबू स्पर्धतील पहिल्या सामन्यात टीएनसीए ईलेव्हन विरुद्धन निराशाजनक कामगिरी केली आहे. श्रेयसने पहिल्या डावात 2 तर दुसर्या डावात 22 धावा केल्या.
श्रेयस स्पिन बॉलिंग विरुद्ध उघडा पडला. लेफ्ट आर्म स्पिनर साई किशोर याने श्रेयसला पहिल्या डावात आऊट केलं. तर दुसऱ्या डावात त्याला सुरुवात मिळाली, मात्र त्याला 25 पारही जाता आलं नाही. अशात कॅप्टन रोहित आणि बीसीसीआय निवड समिती श्रेयसला बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेतून डच्चू मिळू शकतो.
श्रेयस दोन्ही डावात अपयशी
Shreyas Iyer’s struggles in the red-ball format persist! 😦
He was unable to capitalize on opportunities in the ongoing Buchi Babu tournament.#ShreyasIyer #BuchiBabu #Cricket pic.twitter.com/7sMLImkIDi
— OneCricket (@OneCricketApp) August 30, 2024
पहिला सामना, 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई
दुसरा सामना, 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, कानपूर
बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संभावित संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.