टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेच्या 15 व्या आणि शेवटच्या सराव सामन्यात बांगलादेश विरुद्ध 60 धावांनी शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने बांगलादेशसमोर विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशला 8 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 120 धावाच करता आल्या. बांगलादेशकडून महमदुल्लाह याने सर्वाधिक 40 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 183 धावांचा पाठलाग करायला आलेल्या बांगलादेशला सुरुवातीपासूनच झटके द्यायला सुरुवात केली. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी झटपट धक्के दिल्याने बांगलादेशला कमबॅक करणं शक्यच झालं नाही. बांगलादेशकडून महमदुल्लाह याच्या 40 धावांव्यतिरिक्त शाकिब अल हसन याने 28 धावांचं योगदान दिलं. तांझिद हसन याने 17 तर तॉहिद हृदायने 13 धावांचं योगदान दिलं. तिघांना भोपळाही फोडता आला नाही. तांझिम साकिब 1 रनवर नॉट आऊट झाला. तर तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. टीम इंडियाकडून शिवम दुबे आणि अर्शदीप सिंह या दोघांनी 2-2 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल या चौघांनी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने ऋषभ पंत यांचं अर्धशतक आणि हार्दिक पंड्या याच्या नाबाद 40 धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 182 धावांपर्यंत मजल मारली. तर बांगलादेशकडून मेहदी हसन, शोरिफूल इस्लाम, महमदुल्लाह आणि तन्विर इस्लाम या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडियाचा विजय असो
All smiles in New York as #TeamIndia complete a 60-run win in the warmup clash against Bangladesh 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/EmJRUPmJyn#T20WorldCup pic.twitter.com/kIAELmpYIh
— BCCI (@BCCI) June 1, 2024
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
बांगलादेश प्लेईंग टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), सौम्या सरकार, तौहीद ह्रदोय, साकिब अल हसन, महमुदुल्लाह, जाकेर अली, महेदी हसन, रिशाद हुसेन, शोरीफुल इस्लाम, तन्झिद हसन, तन्झिम हसन साकिब आणि तन्वीर इस्लाम.