टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या पूर्वसंध्येला 2 जून रोजी 15 आणि अखेरचा सराव सामना पार पडला. या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश आमनेसामने होते. टीम इंडियाने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात बांगलादेशवर 60 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने बांगलादेशसमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र बांगलादेशला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 122 धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्या दरम्यान बांगलादेशचा गोलंदाज शोरिफूल इस्लाम याच्या हाताला जबर दुखापत झाली. त्यामुळे शोरिफूलला 6 टाके पडले आहेत. त्यामुळे शोरिफूल श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात शोरिफूलला मुकावं लागू शकतं.
शोरिफूलला हार्दिक पंड्या याने मारलेला फटका कॅचमध्ये बदलण्याचा प्रयत्न चांगलाच महागात पडला. शोरिफूलच्या हाताला कॅचच्या प्रयत्नात बॉल जोरात येऊन आदळला. आता शोरिफूल इस्मालच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ज्यामुळे बांगलादेश क्रिकेट टीमच्या अडचणी वाढल्या आहेत. शोरिफूलच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात शोरिफूलला झालेल्या दुखापतीमुळे 6 टाके पडले आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार शोरिफूलला 1 आठवड्याचा वेळ लागू शकतो. त्यामुळे शोरिफूलचं श्रीलंका विरुद्ध खेळणं जवळपास अनिश्चित मानलं जात आहे. श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामना हा 7 जून रोजी होणार आहे.
शोरिफूलची बॉलिंग
शोरिफूलला टीम इंडियाच्या डावातील 20 व्या ओव्हरमधील 5 व्या बॉलवर ही दुखापत झाली. या दुखापतीमुळे शोरिफूलला मैदानातून बाहेर जावं लागलं होतं. त्यामुळे उर्वरित 1 बॉल सहकाऱ्याने टाकला. शोरिफूलने 3.5 ओव्हरमध्ये 26 धावांच्या मोबदल्यात 1 विकेट घेतली.
शोरिफूल दुखापतीमुळे पहिल्या सामन्याला मुकणार?
🚨 REPORTS 🚨
Shoriful Islam received six stitches on his left hand after sustaining an injury during their warm-up game against India 🇧🇩🏏
He needs one week to recover and is doubtful for the opening game against Sri Lanka.#ShorifulIslam #Bangladesh #T20WorldCup… pic.twitter.com/z371hY6g7R
— Sportskeeda (@Sportskeeda) June 2, 2024
टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
बांगलादेश प्लेईंग टीम : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), लिटन दास (विकेटकीपर), सौम्या सरकार, तौहीद ह्रदोय, साकिब अल हसन, महमुदुल्लाह, जाकेर अली, महेदी हसन, रिशाद हुसेन, शोरीफुल इस्लाम, तन्झिद हसन, तन्झिम हसन साकिब आणि तन्वीर इस्लाम.