आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील 33 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध कॅनडा आमनेसामने असणार आहे. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना असणार आहे. टीम इंडियाने सलग 3 सामने जिंकून सुपर 8 मध्ये धडक मारली आहे. तर कॅनडा सुपर 8 च्या स्पर्धेतून बाहेर फेकली गेली आहे. टीम इंडियाला कॅनडा विरुद्ध मात करुन विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला कॅनडा या मोहिमेचा शेवट विजयाने करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्याबाबत आपण जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध कॅनडा सामना शनिवारी 15 जून रोजी खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध कॅनडा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध कॅनडा सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध कॅनडा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तसेच डीडी स्पोर्ट्स चॅनेल्सवर सामना मोफत पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध कॅनडा सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
कॅनडा क्रिकेट टीम: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉनसन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), डाइलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, ऋषीव जोशी, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किरटन, प्रगत सिंह, रविंद्रपाल सिंह आणि रेयानखान पठान.