IND vs CAN T20 WC Highlights Updates: टीम इंडिया-कॅनडा सामना रद्द

| Updated on: Jun 15, 2024 | 9:54 PM

India vs Canada, T20 world Cup 2024 Highlights Updates: टीम इंडिया विरुद्ध कॅनडा या दोन्ही संघांचा हा टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना होता. हा सामना अखेर रद्द करण्यात आला.

IND vs CAN T20 WC Highlights Updates: टीम इंडिया-कॅनडा सामना रद्द
florida outfiled ind vs can match
Image Credit source: Icc X account
Follow us on

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 33 व्या सामन्यात ए ग्रुपमधील टीम इंडिया विरुद्ध कॅनडा आमनसामने होते.  हा सामना पावसाच्या अवकृपमुळे ओल्या झालेल्या खेळपट्टीमुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडिया आणि कॅनडा दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाला आहे.  आयसीसी आणि बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. टीम इंडिया आणि कॅनडा या दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना होता. हा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रीजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा येथे आयोजित करण्यात आला होता. मात्र टॉस न होताच सामना अखेर रद्द झाला. त्यामुळे सामना पाहण्यासाठी उपस्थित राहिलेल्या क्रिकेट चाहत्यांना मोठा भ्रमनिरासही झाला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Jun 2024 09:04 PM (IST)

    IND vs CAN Live Updates: टीम इंडिया-कॅनडा सामना रद्द

    या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडिया विरुद्ध कॅनडा सामना रद्द करण्यात आला आहे. ओल्या खेळपट्टीमुळे हा सामना रद्द करावा लागला आहे. त्यामुळे टीम इंडिया आणि कॅनडा दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला आहे. टीम इंडिया आणि कॅनडा या दोन्ही संघांचा साखळी फेरीतील हा शेवटचा सामना होता.

    टीम इंडिया-कॅनडा सामना कॅन्सल

     

  • 15 Jun 2024 08:22 PM (IST)

    IND vs CAN Live Updates: आता रात्री 9 वाजता पाहणी होणार

    टीम इंडिया विरुद्ध कॅनडा सामन्याला ओल्या खेळपट्टीमुळे अजूनही टॉस झालेला नाही.  रात्री 8 वाजता पंचांनी पंचनामा केल्यानंतर मोठी अपडेट समोर आली आहे. आता भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता पंचनामा करण्यात येणार आहे.

    आता 9 वाजता पाहणी

    The wait continues ⏳

    Next inspection at 11:30 AM Local Time (9:00 PM IST).#T20WorldCup | #TeamIndia | #CANvIND https://t.co/jIH8wRCF0w

    — BCCI (@BCCI) June 15, 2024


  • 15 Jun 2024 07:17 PM (IST)

    IND vs CAN Live Updates: टीम इंडिया-कॅनडा टॉसला विलंब

    टीम इंडिया विरुद्ध कॅनडा सामन्याबाबत अपडेट आली आहे. सामन्याला विलंबाने सुरुवात होणार आहे. खेळपट्टीची रात्री 8 वाजता पाहणी करण्यात येणार आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली आहे.

    8 वाजता पाहणी

  • 15 Jun 2024 06:40 PM (IST)

    IND vs CAN Live Updates: कॅनडा क्रिकेट टीम

    कॅनडा क्रिकेट टीम: साद बिन जफर (कॅप्टन), आरोन जॉनसन, श्रेयस मोव्वा (विकेटकीपर), डाइलन हेलिगर, दिलप्रीत बाजवा, ऋषीव जोशी, जेरेमी गॉर्डन, जुनैद सिद्दीकी, कलीम सना, कंवरपाल तथगुर, नवनीत धालीवाल, निकोलस किरटन, प्रगत सिंह, रविंद्रपाल सिंह आणि रेयानखान पठान.

  • 15 Jun 2024 06:40 PM (IST)

    IND vs CAN Live Updates: टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :

    टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

  • 15 Jun 2024 06:35 PM (IST)

    IND vs CAN Live Updates: टीम इंडिया-कॅनडा आमनेसामने

    टीम इंडिया विरुद्ध कॅनडा यांच्यातील सामन्याला आज रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे.  तर त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे. टीम इंडिया आणि कॅनडाचा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या सामन्यात विजय मिळवून शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे.