हैदराबाद | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 2021 नंतर यंदा कसोटी मालिका होत आहे. एकूण 5 सामन्यांची ही मालिका असणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाचं कर्णधारपद आहे. तर जसप्रीत बुमराह उपकर्णधार आहे. तर इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स इंग्लंडची कॅप्टन्सी करणार आहे. या दोघांमधील पहिल्या सामन्यासाठी खेळाडू आणि क्रिकेट चाहते सज्ज आहेत. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना हा 25 जानेवारी रोजी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामन्याआधी सकाळी 9 वाजता टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना स्पोर्ट्स 18 नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपवर फुकटात पाहायला मिळणार.
पहिल्या 2 कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.
पहिल्या कसोटीसाठी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फॉक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, मार्क वुड, टॉम हार्टले आणि जॅक लीच.