मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागला. कर्णधार रोहित शर्मा याने क्षणाचाही विलंब न करत फलंदाजी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा अंदाज आधीच असल्याने त्याने हा निर्णय घेतला. तसेच प्लेइंग इलेव्हनध्ये तीन बदल असल्याचं सांगितलं. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यात नाहीत. तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आराम देण्यात आला आहे. त्याऐवजी तीन खेळाडूंची संघात निवड करण्यात आली आहे. मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि रजत पाटीदार यांना संघात संधी देण्यात आली आहे. मोहम्मद सिराजला कसोटी मालिकेतून आराम देण्यात आला आहे. त्यांची जागा भरून काढण्याचं मोठं आव्हान कर्णधार रोहित शर्मा याच्यापुढे होतं. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर रोहित शर्मान प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल केले हे सांगितलं.
“खेळात दुखापती होत असतात हा खेळाचा भाग आहे. त्यामुळे बेंचवर राखीव खेळाडू असतात. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा नाहीत. तर मोहम्मद सिराजला आराम देण्यात आला आहे. त्यांच्या जागी मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि रजत पाटीदार यांना संधी देण्यात आली आहे.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं. सरफराज खान याच्या नावाची चर्चा होती. पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याची निवड झाल्यास स्थान मिळण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटी संघाची घोषणा अजूनही बीसीसीआयने केलेली नाही. त्यामुळे कोणते खेळाडू संघात येतील आणि बाहेर जातील हे स्पष्ट नाही.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन