विशाखापट्टणम | टीम इंडियाने इंग्लंडला दुसऱ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी विजयासाठी 399 धावांचं आव्हान दिलं आहे. इंग्लंडने टीम इंडियाला दुसऱ्या डावात 255 धावांवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाकडे पहिल्या डावात 143 धावांची आघाडी होती. तर दुसऱ्या डावात शुबमन गिल याने केलेल्या 104 धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाला 255 धावांपर्यंतच मजल मारता आली. टीम इंडियाला मोठी धावसंख्या करण्याची संधी होती. मात्र इंग्लंडच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला रोखलं. आता भारतीय गोलंदाजांसमोर इंग्लंडला रोखण्याचं आव्हान असणार आहे.
टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या डावात 253 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर दुसऱ्या दिवसापर्यंत टीम इंडियाने दुसऱ्या डावात बिनबाद 28 धावा केल्या. मात्र तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला 10 विकेट्सच्या मोबदल्यात 227 धावाच करता आल्या. या 227 पैकी एकट्या शुबमन गिल याने सर्वाधिक 104 धावांचं योगदान दिलं. शुबमन व्यतिरिक्त टीम इंडियाच्या एकालाही मोठी खेळी करता आली नाही.
शुबमन व्यतिरिक्त टीम इंडियाकडून अक्षर पटेल याने 45 धावा केल्या. तर श्रेयस अय्यर आणि आर अश्विन या दोघांनी प्रत्येकी 29 धावा केल्या. पहिल्या डावात द्विशतकी खेळी करणारा यशस्वी जयस्वाल 17 धावांवर माघारी परतला. जेम्स एंडरसनने याच सामन्यात दुसऱ्यांदा यशस्वीला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्याआधी कॅप्टन रोहित शर्मा याला आऊट करत टीम इंडियाला पहिला झटका दिला.
इंग्लंडसमोर 399 धावांचं आव्हान
India 255 all out leaves us needing 399 for victory 🏏
And you know we’ll go for it…
Match Centre: https://t.co/tALYxvMByx
🇮🇳 #INDvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/EGF7iRhx9q
— England Cricket (@englandcricket) February 4, 2024
रोहितने 13 धावा केल्या. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह दोघेही झिरोवर आऊट झाले. तर तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. इंग्लंडकडून टॉम हार्टली याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. रेहान अहमद याने 3 विकेट्स घेतल्या. जेम्स एंडरसन याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर शोएब बशीर याने 1 विकेट घेतली
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.