IND vs ENG : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच इंग्लंडच्या कर्णधाराला भरली धडकी, नाणेफेकीनंतर सगळं सांगून टाकलं

| Updated on: Feb 02, 2024 | 10:03 AM

भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला असून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर टीम इंडियाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

IND vs ENG : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वीच इंग्लंडच्या कर्णधाराला भरली धडकी, नाणेफेकीनंतर सगळं सांगून टाकलं
IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या कर्णधाराने आधीच टाकली नांगी, नाणेफेकीनंतर टीम इंडियाबाबत म्हणाला...
Follow us on

मुंबई : पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना इंग्लंड जिंकल्यानंतर टीम इंडिया भानावर आली आहे. दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत कमबॅक करण्याचं मोठं आव्हान आहे. त्या दृष्टीने भारताने मोर्चेबांधणी केली आहे. विशाखापट्टणम येथील खेळपट्टीचा अंदाज घेऊन टीम इंडियात बदल केले आहेत. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा संघात नाहीत. तर मोहम्मद सिराजला आराम देण्यात आला आहे. त्यांच्याऐवजी संघात मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि रजत पाटीदारला संधी देण्यात आली आहे. भारताच्या रणनितीचा अंदाज घेऊन इंग्लंडने आपली प्लेइंग इलेव्हन आधीच जाहीर केली आहे. शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन यांना संघात स्थान दिलं आहे. मात्र दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाला पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही याचा अंदाज इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला आहे. त्यात नाणेफेकीचा कौल गमवल्यानंतर त्याची मानसिकता पराभवाची झाली असल्याचं दिसून आलं आहे. नाणेफेकीच्या कौल झाल्यानंतर त्याने याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाला बेन स्टोक्स?

“आम्हाला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घ्यायची होती. पण तसं झालं नाही. मागचा आठवडा खरंच खूप छान गेला. पण आम्हाला माहिती आहे की, टीम इंडिया कमबॅक करणार. मागच्या सामन्यातील विजयामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे त्याचा फायदा आम्हाला दुसऱ्या कसोटी सामन्यात होईल.”, असं इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने सांगितलं. दुसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि मालिकेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना इंग्लंडने जिंकला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिप गुणतालिकेत मोठा उलटफेर होईल. तर मालिकेवरही पकड आणखी घट्ट होईल.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार, कुलदीप यादव

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन