मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना जिंकण्याचं मोठं आव्हान टीम इंडियासमोर आहे. कारण पहिला सामना जिंकत इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्या डावात भारताकडे १४३ धावांची आघाडी होती. तसेच भारताने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या आणि ३९८ धावा झाल्या. तसेच इंग्लंडसमोर विजयासाठी ३९९ धावांचं आव्हान दिलं. दुसऱ्या डावात शुबमन गिल आणि अक्षर पटेल वगळता एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे टीम इंडियासमोर या धावा रोखण्याचं मोठं आव्हान आहे. कारण इंग्लंडची बेझबॉल निती कधी काय करेल सांगता येत नाही. असं सर्व चित्र असताना दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहवर नको ती वेळ आली. संघाच्या धावांमध्ये भर घालण्यासाठी जसप्रीत बुमराहने सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण पदरी निराशा पडली.
जसप्रीत बुमराहने आर अश्विनसोबत नवव्या गड्यासाठी जबरदस्त साथ दिली. दोघांनी मिळून २६ धावांची भागीदारी केली. पण या भागीदारीत जसप्रीत बुमराहचं योगदान शून्य होतं. इतकंच काय तर जसप्रीत बुमराहने या भागीदारी २६ चेंडूंचा सामना केला. पण एकही धाव घेता आली नाही. जसप्रीत बुमराह २६ चेंडू खेळत शू्न्यावर बाद झाला. टॉम हार्टलेच्या गोलंदाजीवर बेअरस्टोने त्याचा उत्तम झेल घेत तंबूत पाठवलं. त्यामुळे २६ चेंडू खेळून एकही धाव न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होते. दुसरीकडे, तळाचे तीन फलंदाज शून्यावर राहीले. कुलदीप यादव ५ चेंडूत खेळत शून्यावर बाद झाला. तर मुकेश कुमार २ चेंडू खेळत शून्यावर नाबाद राहिला.
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन