मुंबई : भारत इंग्लंड दुसऱ्या कसोटीत टीम इंडियासमोर कमबॅक करण्याचं आव्हान होतं. पण टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत साजेशी कामगिरी केली. इंग्लंडला बॅकफूटवर ढकलण्यात टीम इंडियाला यश आलं. गोलंदाजांनी आपली भूमिका चोखपणे बजावली. आर अश्विन, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांनी इंग्लंडच्या फलंदाजांना दिवसा तारे दाखवले. विजयासाठी 399 धावांचं आव्हान इंग्लंसमोर होतं. पण बेझबॉल रणनितीमुळे कोणाचा विजय होईल हे काही सांगता येत नव्हतं. त्यामुळे दुसऱ्या डावात टीम इंडियासाठी विकेट महत्त्वाचे होते. त्यात फॉर्मात असलेल्या फलंदाजांना बाद करण्याचं आव्हान होतंच. ओली पोपने पहिल्या कसोटी मोठी खेळी करत टीम इंडियाच्या पराभवाची स्क्रिप्ट लिहिली होती. पण दुसऱ्या कसोटीत त्याला रोखण्यात टीम इंडियाला यश आलं. पहिल्या डावात बुमराहने यॉर्कर अस्रावर त्याचा त्रिफळा उडवला होता. तर दुसऱ्या डावात आर अश्विनने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. अवघ्या 0.45 सेंकदात त्याचा खेळ खल्लास झाला.
इंग्लंडच्या 2 गडी बाद 132 धावा झाल्या होत्या. झॅक क्राउले अर्धशतकी खेळी करत जम बसवून होता. तर ओली पोपच्या रुपाने डोकेदुखी वाढली होती. आर अश्विनने षटकाचा दुसरा चेंडू टाकला आणि काही कळायच्या आतच रोहित शर्माच्या हाती चेंडू बसला. फक्त 0.45 सेकंदात जे काही व्हायचं ते झालं. ओली पोपलाही विश्वास बसला नाही. पण रोहित शर्माने झेल घेतला हे त्याला स्वीकारावं लागलं आणि तंबूच्या दिशेने जावं लागलं. अश्विनला पहिल्या डावात एकही गडी बाद करता आला नव्हता. पण दुसऱ्या डावात अश्विनने कमाल केली.
The reaction time was just 0.45 Seconds for Rohit Sharma. 🔥
– Rohit has been one of the best fielders in slips. pic.twitter.com/CDlhmGHURB
— Johns. (@CricCrazyJohns) February 5, 2024
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन