ENG vs IND 2nd Test Toss | इंडियाने टॉस जिंकला, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?

| Updated on: Feb 02, 2024 | 9:59 AM

India vs England 2nd Test Toss Update | दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकला आहे. दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 आणि टीम इंडियाने 3 बदल केले आहेत.

ENG vs IND 2nd Test Toss | इंडियाने टॉस जिंकला, प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोण?
Follow us on

विशाखापट्टणम | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टॉस जिंकला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीसाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये एकूण 3 बदल केले आहेत. तर इंग्लंडने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. टीम इंडियाकडून रजत पाटीदार याला पदार्पणाची संधी दिली आहे. रजत पाटीदार याला पहिल्या 2 कसोटीसाठी विराट कोहली याच्या जागेवर संधी देण्यात आली आहे.

टीम इंडियात 3 बदल

टीम इंडियात 3 बदल आहेत. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा हे दोघे खेळणार नसल्याचं आधीच स्पष्ट होतं. तर मोहम्मद सिराज याला बाहेर ठेवण्यात आलं आहे. तर या तिघांच्या जागी रजत पाटीदार, मुकेश कुमार आणि मुकेश कुमार या तिघांना संधी देण्यात आली आहे. मोहम्मद सिराज याला दुसऱ्या कसोटीतून विश्रांती देण्यात आली आहे. सिराज सातत्याने क्रिकेट खेळतोय अशा परिस्थितीत सिराजबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर सिराज हा राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी उपलब्ध असेल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

जेम्स एंडरसन याची एन्ट्री

इंग्लंडने 2 बदल केले आहेत. जॅक लीच आणि मार्क वूड या दोघांना बाहेर करण्यात आलं आहे. तर या दोघांच्या जागी दिग्गज अनुभवी जेम्स एंडरसन याला संधी देण्यात आली आहे. तर बशीर अहमद या युवा खेळाडूला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली आहे. दरम्यान टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. इंग्लंडने पहिल्या सामन्यात टीम इंडियावर 28 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता दुसरा सामना जिंकून टीम इंडियाचा मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न असणार आहे.

टीम इंडियाने टॉस जिंकला

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर आणि जेम्स अँडरसन.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, श्रीकर भारत (डब्ल्यू), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार.