राजकोट | आर अश्विन याच्याशिवाय मैदानात उतरलेल्या टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाची जोरदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाने इंग्लंडला झटपट 2 झटके देत बॅकफुटवर ढकलण्याचं काम केलं आहे. टीम इंडियाने सोबतच इंग्लंडची 24 तासांच्या आत परतफेडही केली आहे. आता फक्त टीम इंडियासमोर शतकवीर बेन डकेट याला रोखण्याचं आव्हान असणार आहे.
टीम इंडियाने केलेल्या 445 धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या दिवशी बेन डकेट याच्या नाबाद 133 धावांच्या जोरावर 2 विकेट गमावून 207 धावा केल्या. इंग्लंड त्यानंतरही 238 धावांनी पिछाडीवर होती. त्यानंतर जो रुट आणि डकेट या जोडीने तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. टीम इंडियाने इंग्लंडला मात्र 30 मिनिटांच्या आत 2 झटके देत शानदार सुरुवात केली. जसप्रीत बुमराहने आधी जो रुट याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर कुलदीप यादवने जॉनी बेयरस्टो याला आऊट केलं.
जो रुटने बुमराहच्या बॉलिंगवर रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला. रुट या प्रयत्नात स्लीपमध्ये यशस्वी जयस्वाल याच्या हाती कॅच आऊट झाला. बुमराहने रुटला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवण्याची ही नववी वेळ ठरली. त्यानंतर बेयरस्टो हा झिरोवर एलबीडब्ल्यू झाला. बेयरस्टोने रीव्हीव्यू घेत अंपायरच्या निर्णायाला आव्हान दिलं. मात्र इंग्लंडला रीव्हीव्यू गमवावा लागला.
टीम इंडियाने इंग्लंडला 2 धक्के देत दुसऱ्या दिवसाचा हिशोब क्लिअर केला. इंग्लंडने टीम इंडियालाही दुसऱ्या दिवशी झटपट 2 धक्के दिले होते. इंग्लंडने आधी कुलदीप यादव आणि त्यानंतर रवींद्र जडेजाला आऊट केलं. आता टीम इंडियानेही इंग्लंडसोबत तसंच करत इंग्लंडचा हिशोब बरोबर केला आहे.
बेयरस्टो झिरोवर आऊट
And Kuldeep Yadav strikes from the other end! ⚡️⚡️
Jonny Bairstow is out L.B.W ☝️
Follow the match ▶️ https://t.co/FM0hVG5X8M#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/knyKISNSvn
— BCCI (@BCCI) February 17, 2024
दरम्यान टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर आर अश्विन याने तिसऱ्या कसोटीतून तडकाफडकी माघार घेतली आहे. अश्विन कौटुंबिक कारणामुळे खेळणार नाहीये. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आता 1 बॉलर-बॅट्समनचा पर्याय कमी झाला आहे. मात्र सब्स्टीट्यूड म्हणून देवदत्त पडीक्कल मैदानात आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.