मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका आता 1-1 ने बरोबरीत आहे. मालिकेतील पहिला सामना इंग्लंड आणि दुसरा सामना टीम इंडियाने जिंकला होता. आता येत्या 15 तारखेपासून तिसऱ्या कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाच्या मागे दुखापतींचं ग्रहण लागलेलं आहे. आधीच विराट कोहली मालिकेतून बाहेर असल्याने त्याची उणीव भासत आहे. अशातच आता के.एल. राहुल हा तिसऱ्या कसोटीमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता प्लेइंग मध्ये कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. यासाठी कॅप्टन रोहित शर्माला मोठे निर्णय घ्यावे लागणार आहेत.
तिसरा सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये अनेक बदल होणार आहेत. रवींद्र जडेजा आता फिट झाला असून तो खेळणार असल्याचं फिक्स असल्याचं बोललं जात आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये जडेजा प्लेइंग 11 मध्ये आल्यावर दोनपैकी एका खेळाडूला बाहेर बसावं लागणार आहेत. कोण आहेत ते दोन खेळाडू जाणून घ्या.
रवींद्र जडेजा आल्यावर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्यातील एकालाच प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. या दोनपैकी एक खेळाडू कुलदीप यादव याचा पत्ता कट होण्याची जास्त शक्यता आहे. रोहित शर्मा आणि टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दोन्ही कसोटींमध्ये अक्षर पटेल याला खेळण्याची संधी मिळाली होती. दोन्ही सामन्यात मिळून त्याने 5 विकेट घेतल्या आहेत. तर फलंदाज म्हणून 133 धावा केल्या आहेत. तर कुलदीप यादव याला फक्त एक सामन्यातच संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या तर 8 धावांचं योगदान दिलं होतं.
तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर , कुलदीप यादव , मोहं. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, देवदत्त पडिक्कल.