राजकोट | टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या कसोटीत टॉस जिंकून बॅटिगंचा निर्णय घेतला. 2 सामन्यानंतर 5 सामन्यांच्या मालिकेत उभसंघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकून मालिकेत 1-1 बरोबरी साधली आहे. तिसरा कसोटी सामना हा दोन्ही संघांतील काही खेळाडूंसाठी अतिशय महत्तवाचा आणि अविस्मरणीय ठरला आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याचा तिसरा सामना हा त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 100 वा सामना ठरला आहे. तसेच टीम इंडियाकडून ध्रुव जुरेल आणि सरफराज खान या दोघांनी आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं आहे. सरफाराजने पदार्पण करताच रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
सरफराजने पदार्पणात टीम इंडियाचा बॅट्समन शुबमन गिल याला झटका दिला आहे. सरफराजने शुबमन गिलचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. शुबमन गिल याने टीम इंडियासाठी टेस्ट डेब्यू केलं तेव्हा त्याचा फर्स्ट क्लास क्रिकेटमधील 23 सामन्यानंतर एव्हरेज हा 68.78 इतका होता. तर सरफराज खान याचा एव्हरेज हा 45 फर्स्ट क्लास सामन्यानंतर 69.85 इतका आहे. यामध्ये एक त्रिशतक आणि 14 शतकांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय पदार्पण करताना सर्वाधिक फर्स्ट क्लास एव्हरेज हा विनोद कांबळी याच्या नावावर आहे. विनोद कांबळी याने 27 सामन्यात 88.37 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या स्थानी प्रवीण आमरे आहे. आमरे यांनी 23 सामन्यांमध्ये 81.23 च्या सरासरीने धावा केल्या.
सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या दोघांचं कसोटी पदार्पण
Two debutants for India as Rohit Sharma calls correctly at the toss and the hosts will bat first in the third Test against England 🏏
INDvENG | WTC25https://t.co/SZESpV3iNg pic.twitter.com/1rA5rkEXSt
— ICC (@ICC) February 15, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.