IND vs ENG 3rd Test : शुबमन गिल ठरला 9 चेंडूचा गिऱ्हाईक, सोशल मीडियावर युजर्संनी घेतली फिरकी

| Updated on: Feb 15, 2024 | 11:50 AM

कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिग्गज खेळाडूंच्या दुखापती आणि काहींनी पाठ फिरवल्याने नव्या खेळाडूंवर मदार आहे. चार खेळाडूंचं तिसऱ्या कसोटीत डेब्यू झालं. पण अनुभवाची उणीव त्यांच्या फलंदाजीतून दिसून येत आहे. रजत पाटीदार या सामन्यातही काही खास करू शकला नाही. तर शुबमन गिलला आपलं खातंही खोलता आलं नाही.

IND vs ENG 3rd Test : शुबमन गिल ठरला 9 चेंडूचा गिऱ्हाईक, सोशल मीडियावर युजर्संनी घेतली फिरकी
IND vs ENG 3rd Test : शुबमन गिलला जमतंच नाही! नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर घेतली शिकवणी
Follow us on

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि कसोटी मालिकेच्या दृष्टीने तिसरा सामना खूपच महत्त्वाचा आहे. या सामन्यातील निकालानंतर बरीच उलथापालथ झालेली असेल. अशा या निर्णायक सामन्यातील पहिल्या डावात भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. तीन खेळाडू स्वस्तात बाद झाल्याने अनुभवी खेळाडूंना मोर्चा सांभाळण्याची वेळ आली. राजकोटमध्येही शुबमन गिल काही खास करू शकला नाही. वन डाऊन उतरल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. यशस्वी जयस्वाल स्वस्तात बाद झाल्याने त्याला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी होती. पण ही संधीही गिलने गमावली आहे. सावध पवित्रा घेतलेल्या शुबमन गिलला मार्क वूडने तंबूचा रस्ता दाखवला. शुबमन गिलने 9 चेंडूंचा सामना केला आणि बाद झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही. मार्क वूडच्या गोलंदाजीवर फोक्सने त्याला झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर सोशल मीडियावर शुबमन विरोधी गट जागा झाला आहे. वारंवार संधी मिळूनही काही खास करत नसल्याने टीका होत आहे. मागच्या सामन्यातील शतकी खेळी सोडली तर गिल वारंवार फ्लॉप होत आहे.

शुबमन गिल शून्यावर बाद झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्या विरोधात एक मोहीम उघडली. तसेच हस्यास्पद मीम्स त्याच्या नावाने शेअर केले जात आहेत. तसेच त्याच्या जागी ऋतुराज गायकवाड याला संधी देण्याची मागणी केली. पाटा विकेटवर खातं खोलण्यात अपयश आल्याने खडेबोल सुनावले आहेत. शुबमन गिल कसोटीत चौथ्यांदा शून्यावर बाद झाला आहे. हैदराबादच्या कसोटीच्या दुसऱ्या डावात अशीच स्थिती होती. त्यामुळे त्याच्या खेळण्याच्या शैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तसेच त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर भर देण्याचा सल्ला काही नेटकऱ्यांनी दिला आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन