रांची | टीम इंडिया इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने 192 धावांचा पाठलाग करताना दिवसाचा खेळ संपेपर्यंत बिनबाद 40 धावा केल्या आहेत. कॅप्टन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही सलामी जोडी अनुक्रमे नाबाद 24 आणि 16 धावा करुन नाबाद परतले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला चौथ्या दिवशी विजयासाठी आणखी 152 धावांची गरज आहे. तसेच टीम इंडियाला सामन्यासह मालिका जिंकण्याची संधी आहे. मात्र इंग्लंडही फाईटबॅक करेल. त्यामुळे चौथ्या दिवशी चांगलीच चुरस पाहायला मिळेल.
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने ध्रुव जुरेल याच्या 90 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 307 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडिया इंग्लंडने केलेल्या 352 धावांचा टप्पा पार करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे इंग्लंडला 46 धावांची आघाडी मिळाली. मात्र दुसऱ्या डावात इंग्लंडची आर अश्विन आणि कुलदीप यादव या दोघांच्या फिरकीसमोर काहीच चाललं नाही. इंग्लंडचा दुसरा डाव अवघ्या 145 धावांवर आटोपला. त्यामुळे भारताला 192 धावांचं आव्हान मिळालं.
टीम इंडियाने तिसऱ्या दिवसापर्यंत बिनबाद 40 धावा केल्या. त्यामुळे चौथ्या दिवशी विजयासाठी 153 धावांची गरज आहे. आता चौथ्या दिवशी सामन्याचा निकाल काय लागतो, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. कारण टीम इंडियाला 2014 पासून ते आतापर्यंत एकूण 21 वेळा 150 पेक्षा अधिक धावांचं आव्हान मिळालं आहे. त्यापैकी टीम इंडिया फक्त 1 वेळाच विजय मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. तर 14 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर टीम इंडिया 6 सामने बरोबरीत सोडवण्यात यशस्वी ठरली आहे. त्यामुळे आता चौथा दिवस हा निर्णायक ठरणार आहे.
कोण जिंकणार चौथा सामना?
Stumps.
India close Day 3 on 4️⃣0️⃣-0️⃣, requiring 1️⃣5️⃣2️⃣ more runs to win.
🇮🇳 #INDvENG 🏴 #EnglandCricket pic.twitter.com/6vomcMKOv5
— England Cricket (@englandcricket) February 25, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.