रांची | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना रंगतदार स्थितीत आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी हा सामना करो या मरो असा आहे. सामन्याच्या सुरुवातीला टीम इंडिया इंग्लंडवर वरचढ होती. मात्र इंग्लंडने जोरदार कमबॅक करत पलटवार केला. या सामन्यात टीम इंडियासोबत उघडउघड फसवणूक झाली. असंख्य एचडी कॅमेरे असूनही टीम इंडियासोबत चिटींग झाली. या सामन्यात इंग्लंडकडून 11 नाही, तर 12 खेळाडू खेळत होते, असा आरोप आता करण्यात येत आहे.
या सामन्यात बॅकफुटवर जाण्याचं मोठं कारण म्हणजे अंपायरने घेतलेले अंपायर्सं कॉल अर्थात निर्णय. अंपायरने घेतलेले 7 निर्णय टीम इंडियाच्या विरुद्ध गेले. टीम इंडियाचे 4 फलंदाज हे अंपायरच्या चुकीचे शिकार झाले. ज्यामुळे टीम इंडियाची पहिल्या डावात घसरगुंडी झाली. टीम इंडियाने चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी 7 विकेट्स गमावले. त्यापैकी 3 फलंदाज हे अंपायरच्या निर्णयाचे बळी ठरले. तर तिसऱ्या दिवशी डेब्युटंट आकाश दीपही अंपायर्स कॉलचा बळी ठरला.
शुबमन गिल, रजत पाटीदार आणि आर अश्विन यांचाही समावेश आहे. शुबमनला अंपायरने एलबीडब्ल्यू आऊट दिलं. रिप्लेमध्ये इमपॅक्ट अंपायर्स कॉल होता. त्यानंतर अश्विन आणि रजत पाटीदारसोबत अंपायर्स कॉलमुळे घात झाला. तिसऱ्या दिवशी आकाश दीपला अंपायर्स कॉलमुळे मैदानाबाहेर जावं लागलं. या सामन्यात श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि ऑस्ट्रेलियाचे रोड टकर हे दोघे फिल्ड अंपायर आहेत.
दरम्यान फिल्डिंग दरम्यानही पंचांच्या निर्णयाचा फटका टीम इंडियाला बसला. ज्यामुळे टीम इंडियाला 3 रीव्हीव्यू गमवावे लागले. अंपायरचे हे निर्णय इंग्लंडच्या पथ्यावर पडले. इंग्लंड ओपनर बेन डकेट अंपायर कॉलमुळे वाचला. ओली पोप आणि जॉनी बेयरस्टो यांच्यावरही अंपायर कॉलचा वरदहस्त राहिला. मात्र रीव्हीव्यूमुळे या दोघांना मैदानाबाहेर जावं लागलं. आता इतकंच नाही, तर ओली रॉबिन्सन यालाही अंपायरने आऊट जाहीर केलं नाही. तेव्हा रॉबिन्सन 8 धावांवर खेळत होता. रॉबिन्सने रुटला चांगली साथ दिली. दोघांनी 58 धावांची भागीदारी केली. दोघांनी केलेल्या भागीदारीमुळे इंग्लंडने पहिल्या डावात 353 धावांपर्यंत मजल मारली.
अंपायरची इंग्लंडकडून बॅटिंग
I heard Kohli FC and English fans started crying on DRS?
Let me show you some of the biased decisions made by umpires against India#INDvENG pic.twitter.com/LuHOjJnZ2L
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) February 25, 2024
आता अंपायरने दिलेले बहुतांश कॉल टीम इंडिया विरुद्ध गेले. तर इंग्लंडच्या पथ्यावर पडले. त्यामुळे मैदानात इंग्लंडकडून 11 नाही, तर 12 खेळाडू खेळत असल्याची टीका केली जात आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.