धर्मशाला | कुलदीप यादव आणि आर अश्विन या फिरकी जोडीसमोर इंग्लंडचं पॅकअप झालं आहे. इंग्लंडने धर्मशालेत टीम इंडिया विरुद्धच्या पाचव्या कसोटीतील पहिल्या डावात शरणागती पत्कारली आहे. इंग्लंडचा पहिला डाव हा 218 धावांवर आटोपला. इंग्लंडने अखेरच्या 7 विकेट्स या अवघ्या 43 धावांच्या मोबदल्यात गमावल्या. इंग्लंडची स्थिती 4 बाद 175 वरुन ऑलआऊट 218 अशी झाली. इंग्लंडला 57.4 ओव्हरमध्ये 218 धावांपर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाकडून फिरकी गोलंदाजांनीच सर्वच्या सर्व 10 विकेट्स घेतल्या.
इंग्लंडची सुरुवात जोरदार झाली. बेन डकेट आणि झॅक क्रॉली या दोघांनी 64 धावांची सलामी भागीदारी केली. त्यानंतर बेन डकेट 27 धावांवर आऊट झाला. त्यानंतर इंग्लंडलने ओली पोप याच्या रुपात दुसरी विकेट गमावली. झॅक क्रॉली आऊट झाल्याने इंग्लंडची स्थिती 3 बाद 137 झाली. क्रॉलीने सर्वाधिक 79 धावांची खेळी केली. क्रॉली आऊट झाल्यानंतर इंग्लंडचा डाल गडगडला. इंग्लंडने पुढील 7 विकेट्स या 43 धावांच्या मोबदल्यात गमावल्या.
जॉनी बेयरस्टो 29, जो रुट 26, कॅप्टन बेन स्टोक्स 0, टॉम हार्टली 6, मार्क वूड 0, बेन फोक्स 24 आणि जेम्स एंडरसन 0 वर आऊट झाला. तर शोएब बशीर 11 धावांवर नाबाद परतला. टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. कुलदीपची कसोटीत 5 विकेट्स घेण्याची चौथी वेळ ठरली. कुलदीपनंतर 100 वा सामना खेळणाऱ्या आर अश्विन याने 4 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजा याने 1 विकेट घेतली.
कुलदीप यादव-आर अश्विनकडून इंग्लंडची चिरफाड
𝙈𝙤𝙢𝙚𝙣𝙩𝙨 𝙇𝙞𝙠𝙚 𝙏𝙝𝙚𝙨𝙚!
R Ashwin 🤝 Kuldeep Yadav
Follow the match ▶️ https://t.co/jnMticF6fc #TeamIndia | #INDvENG | @ashwinravi99 | @imkuldeep18 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/hJyrCS6Hqh
— BCCI (@BCCI) March 7, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.