रांची | आकाश दीप या युवा बॉलिंग ऑलराउंडरने इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातून पदार्पण केलं. आकाश दीपने आपल्या पदार्पणात धमाका उडवून दिला. आकाशने टीम इंडियासाठी 3 विकेट्स घेत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं. आकाशने आधी झॅक क्रॉली याला क्लिन बोल्ड केलं मात्र तो दुर्देवी ठरला. नो बॉल असल्याने झॅक क्रॉली याला जीवनदान मिळालं. मात्र त्यानंतर आकाश दीप याने न खचता जोरदार कमबॅक केलं आणि 3 विकेट्स घेतल्या.
आकाश दीप याने बेन डकेट याला आऊट करत पहिली शिकार केली तसेच टीम इंडियालाही विकेट मिळवून दिली. आकाशने 10 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर ही विकेट घेतली. त्यानंतर याच ओव्हरमधील चौथ्या बॉलवर ओली पोप याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. अंपायरने आधी ओली पोपला नाबाद जाहीर केलं. मात्र कॅप्टन रोहित शर्मा याने रिव्हीव्यू घेतल्याने आकाशला एकाच ओव्हरमध्ये दुसरी विकेट मिळाली. ओली पोपला भोपळाही फोडता आला नाही.
त्यानंतर आकाशने झॅक क्रॉली याचा काटा काढला. आकाशने इंग्लंडच्या डावातील 12 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर ओपनर झॅकला क्रॉली याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. आकाशने सलग 3 विकेट्स घेतल्याने इंग्लंडची 3 बाद 57 अशी नाजूक स्थिती झाली. आता आकाशला आणखी 2 विकेट्स घेतल्यास त्याला पदार्पणात पंजा खोलण्याची संधी आहे.
आकाश दीपची अफलातून सुरुवात
WWW 🤝 Akash Deep!
Follow the match ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/YANSwuNsG0
— BCCI (@BCCI) February 23, 2024
दरम्यान चौथ्या कसोटीतील पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र हे टीम इंडियाच्या नावावर राहिलं. टीम इंडियाने इंग्लंडला 5 झटके देत अर्धा संघ गारद केला. इंग्लंडने पहिल्या सत्रामधील 24.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 112 धावा केल्या. आकाश दीप याने 3, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन या दोघांनी 1-1 विकेट घेतली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.