रांची | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध रांचीत कसोटी मालिकेतील चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. या सामन्याला आता 24 तासांपेक्षा कमी अवधी शिल्लक आहे. हा सामना 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. टीम इंडिया या 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडियाचा चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याआधी एक मोठी अपडेट समोर आली आहे. सामन्याच्या एक दिवसाआधी टीमने प्लेईंग ईलेव्हन जाहीर केली आहे.
इंग्लंड क्रिकेट टीमने प्लेईंग ईलेव्हन नेहमीप्रमाणे आताही 24 तासांआधी जाहीर केली आहे. कॅप्टन बेन स्टोक्स याने प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. टीम मॅनेजमेंटने खेळपट्टीच्या हिशोबाने हे 2 बदल केले आहेत. इंग्लंड प्लेईंग ईलेव्हनमधून वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि लेग स्पिनर रेहान अहमद या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तर फास्टर बॉलर ओली रॉबिन्सन आणि स्पिनर शोएब बशीर या दोघांची एन्ट्री झाली आहे.
दरम्यान इंग्लंडने मालिकेत विजयी सलामी देत जोरदार सुरुवात केली. मात्र त्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडने सलग 2 सामन्यात पराभूत करुन आघाडी घेतली. त्यामुळे इंग्लंडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी हा चौथा सामना कोणत्याही परिस्थिती जिंकावा किंवा बरोबरीत सोडवावा लागेल.
इंग्लंड टीममध्ये 2 बदल
We have named our XI for the fourth Test in Ranchi! 🏏 👇
🇮🇳 #INDvENG 🏴 #EnglandCricket
— England Cricket (@englandcricket) February 22, 2024
टीम इंडिया विरुद्धच्या चौथ्या कसोटी इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.
चौथ्या कसोटीसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप