रांची | इंग्लंडचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार जो रुट याला अखेर टीम इंडिया विरुद्ध सूर गवसला आहे. जो रुट याचा अखेर 13 डावांनंतर धावांचा वनवास संपला आहे. जो रुटने भारतात टीम इंडिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल डावांच्या प्रतिक्षेनंतर अर्धशतक झळकावलं आहे. रुटने रांचीत सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात 108 बॉलमध्ये 4 चौकारांच्या मदतीने आणि 46.30 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक झळकावलं. रुटच्या कसोटी कारकीर्दीतील हे 61 वं अर्धशतक ठरलं.
टीम इंडियाने पहिल्या सत्राच्या शेवटच्या बॉलवर कॅप्टन बेन स्टोक्स याला आऊट केलं. त्यामुळे इंग्लंडने 5 विकेट्स गमावल्या. त्यामुळे इंग्लंडची स्थिती 24.1 ओव्हरमध्ये 5 बाद 112 अशी झाली. मात्र त्यानंतर विकेटकीपर बेन फोक्स आणि जो रुट या दोघांनी इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी 1-1 धाव जोडून इंग्लंडचा धावफक हलता ठेवला. या दरम्यान जो रुट इंग्लंडला खरी गरज असताना मैदानात टिकून राहिला आणि अर्धशतक पूर्ण केलं.
दरम्यान इंग्लंडच्या बेन फोक्स आणि जो रुट या जोडीने दुसऱ्या सत्रापर्यंत सहाव्या विकेटसाठी नाबाद 86 धावांची भागीदारी केली. इंग्लंडने यासह दुसरं सत्र आपल्या नावावर केलं. इंग्लंडची या मालिकेत कोणत्याही एका सत्रात विकेट न गमावण्याची पहिली वेळ ठरली. बेन फोक्स हा 108 बॉलमध्ये 28 आणि जो रुट 154 बॉलमध्ये 67 धावा करुन नाबाद आहे. आता तिसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांसमोर ही जोडी फोडण्याचं आव्हान असणार आहे.
जो रुटची चिवट खेळी
Batting on a different surface.
Well played, @Root66 💪
Match Centre: https://t.co/B58xShTQq5
🇮🇳 #INDvENG 🏴 #EnglandCricket pic.twitter.com/hirBO4Yb9a
— England Cricket (@englandcricket) February 23, 2024
दरम्यान जो रुटने भारतात 2021 नंतर आणि 13 डावानंतर अर्धशतक केलं आहे. रुटने टीम इंडिया विरुद्ध भारतात गेल्या 13 डावात अनुक्रमे 218,40,6,33,17,19,5,30,29,2,5,16,18 आणि 7 धावा केल्या आहेत.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.