IND vs ENG | सरफराज खानचा उडी घेत चाबूक कॅच, एकदा व्हीडिओ बघाच

| Updated on: Feb 25, 2024 | 3:45 PM

india vs england 4th Test Sarfaraz Khan | सरफराज खानने बॅटिंगनंतर फिल्डिंगमध्येही दम दाखवला आहे. सरफराजने रांचीत कडक कॅच घेतलाय.

IND vs ENG | सरफराज खानचा उडी घेत चाबूक कॅच, एकदा व्हीडिओ बघाच
Follow us on

रांची | मुंबईकर सरफराज खान याने इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातून पदार्पण केलं. सरफरजाने पदार्पणातील दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करत आपली छाप सोडली. मात्र त्यानंतर सरफराजला रांचीतील चौथ्या कसोटी सामन्यात बॅटिंगने विशेष काही करता आलं नाही. मात्र सरफराजने फिल्डिंग दरम्यान शानदार योगदान दिलं. सरफराजने हवेत झेप घेत कडक कॅच घेतला आणि इंग्लंडला सातवा झटका दिला. सरफराज खानने या कॅचसह आपल्यावर फिटनेसवरुन टीका करणाऱ्यांचं थोबाड बंद केलंय. सरफराजने घेतलेल्या कॅचचा व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इंग्लंडची घसरगुंडीत सरफराजचं योगदान

टीम इंडियाला 353 धावांच्या प्रत्युत्तरात 307 धावा करता आल्या. त्यामुळे इंग्लंडला 46 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडची दुसऱ्या डावात घसरगुंडी झाली. टीम इंडियाने इंग्लंडला झटपट झटके दिले. त्यामुळे इंग्लंडची 6 बाद 120 अशी स्थिती झाली. त्यानंतर 41 व्या ओव्हरमध्ये इंग्लंडला सातवा झटका लागला.

कुलदीप यादव इंग्लंडच्या डावातील 41 वी ओव्हर टाकायला आला. या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर टॉम हार्टली याने फटका मारला. टॉमने मारलेला फटका टप्पा न घेता सरफराजच्या दिशेने गेला. सरफराजने स्फुर्तीने धावत येत पुढच्या दिशेने उडी घेतली आणि चाबूक कॅच घेतला. सरफराजने कॅच घेतल्याने टॉम हार्टलीला 7 धावांवर माघारी परतावंल लागलं. त्यामुळे इंग्लंडची 7 बाद 133 अशी झाली. आता टीम इंडियाचा इंग्लंडला झटपट गुंडाळण्याचा प्रयत्न असणार आहे.

सरफराज खानचा कडक कॅच

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.