रांची | टीम इंडियाला चौथ्या कसोटी सामन्यात विजय मिळवण्यासाठी 193 धावांचं आव्हान मिळालं आहे. आर अश्विन याने घेतलेल्या 5 विकेट्सच्या जोरावर इंग्लंडचा दुसरा डाव हा 53.5 ओव्हरमध्ये 145 धावांवर आटोपला. तर इंग्लंडकडे 46 धावांची आघाडी होती. त्यामुळे टीम इंडियाला 192 धावांचे आव्हान मिळालंय. आता टीम इंडिया हे आव्हान बेझबॉल नितीचा अवलंब करुन तिसऱ्याच दिवशी सामन्यासह मालिका जिंकणार का, याकडे लक्ष असणार आहे.
टीम इंडियाला 353 धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात 307 धावांवर रोखल्याने इंग्लंडने 46 धावांची आघाडी मिळाली. इंग्लंडने या आघाडीच्या मदतीने दुसऱ्या डावात ऑलआऊट 145 धावा केल्या. इंग्लंडकडून ओपनर झॅक क्रॉली याने सर्वाधिक 60 धावा केल्या. तर जॉनी बेयरस्टो याने 30 धावाचं योगदान दिलं. बेन फोक्स याने 17, बेन डकेट याने 15 आणि जो रुट याने 11 धावा केल्या. तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर तिघे आले तसेच परत गेले. शोएब बशीर 1 धावेवर नाबाद राहिला.टीम इंडियाकडून आर अश्विन याने सर्वाधिक 5 विकेट्स घेत इंग्लंडचा ‘पंच’नामा केला. तर कुलदीप यादव याने इंग्लंडच्या चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रवींद्र जडेजाच्या खात्यात 1 विकेट गेली.
दरम्यान टीम इंडियाला मिळालेलं 193 धावांचं आव्हानही ही अवघड जाऊ शकतं, असं आम्ही नाही तर आकडेवारी म्हणतेय. टीम इंडियाला 2014 पासून कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 21 वेळा 150 पेक्षा अधिक धावांचं आव्हान मिळालंय. टीम इंडियाला 21 पैकी 1 वेळाच फक्त विजय मिळवता आला आहे. तर 14 वेळा पराभवचा सामना करावा लागलाय. तसेच 6 सामने हे अनिर्णित राहिले आहेत.
टीम इंडियासमोर 193 धावांचं आव्हान
Innings Break!
Outstanding bowling display from #TeamIndia 👌 👌
5️⃣ wickets for @ashwinravi99
4️⃣ wickets for @imkuldeep18
1️⃣ wicket for @imjadejaTarget 🎯 for India – 192
Scorecard ▶️ https://t.co/FUbQ3Mhpq9 #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/kpKvzoWV0p
— BCCI (@BCCI) February 25, 2024
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.