धर्मशाला | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने पहिल्या दिवसापर्यंत 1 विकेट गमावून 135 धावा केल्या आहेत. टीम इंडिया इंग्लंडपेक्षा 83 धावांनी पिछाडीवर आहे. खेळ संपेपर्यंत कॅप्टन रोहित शर्मा 52 आणि शुबमन गिल 26 धावांवर नाबाद परतले. तर यशस्वी जयस्वाल याच्या रुपात एकमेव विकेट गमावली. यशस्वी जयस्वाल याने 57 धावा केल्या.
इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र इंग्लंडचा पहिला डाव हा अवघ्या 218 धावांवर आटोपला. टीम इंडियाने या प्रत्त्युतरात जोरदार सुरुवात केली. यशस्वी आणि रोहित या दोघांनी 104 धावांची सलामी भागीदारी केली. यशस्वी 58 बॉलमध्ये 57 धावांची खेळी केली. तर शोएब बशीर याने इंग्लंडसाठी एकमेव विकेट घेतली. मात्र रोहितने एक बाजू लावून धरली.
इंग्लंडच्या सलामी जोडीने जोरदार सुरुवात केली. झॅक क्रॉली आणि बेन डकेट या दोघांनी आश्वासक सुरुवात केली. या दोघांनी 64 धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर इंग्लंडला टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी धडाधड धक्के दिली. इंग्लंडचं मिडल ऑर्डर सपशेल अपयशी ठरले. इंग्लंडला झटपट धक्के देत टीम इंडियाने पहिला डाव 218 धांवावर गुंडाळला. इंग्लंकडून झॅक क्रॉली याने सर्वाधिक 79 धावांची खेळी केली.
टीम इंडियाची जोरदार सुरुवात
Stumps on the opening day in Dharamsala! 🏔️#TeamIndia move to 135/1, trail by 83 runs.
Day 2 action will resume with Captain Rohit Sharma (52*) & Shubman Gill (26*) in the middle 💪
Scorecard ▶️ https://t.co/OwZ4YNtCbQ#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nhUXwzACi4
— BCCI (@BCCI) March 7, 2024
टीम इंडियाकडून कुलदीप यादव याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. 100 वा सामना खेळणाऱ्या आर अश्विन याने चौघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रवींद्र जडेजा याच्या खात्यात 1 विकेट गेली.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, देवदत्त पडीक्कल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेईंग ईलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टली, मार्क वुड, जेम्स अँडरसन आणि शोएब बशीर.