धर्मशाला | इंग्लंड विरुद्धचा पाचवा आणि अखेरचा कसोटी सामना हा टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर आर अश्विन याच्यासाठी फार महत्त्वाचा आणि ऐतिहासिक असा आहे. अश्विनचा धर्मशालेत होणारा कसोटी सामना हा त्याच्या कारकीर्दीतील 100 वा सामना असणार आहे. अश्विनने या 100 व्या कसोटीआधी धर्मशालेत झालेल्या पत्रकार परिषदेत खुलासा केला. मला टीममधून बाहेर काढण्याची चर्चा सुरु होती असं म्हणत अश्विनने त्याच्या कारकीर्दीतील टर्निगं पॉइंटही सांगितला.
टीम इंडियाचा अनुभवी ऑफ स्पिनर आर अश्विन याने कारकीर्दीतील इंग्लंड विरुद्ध 2012 सालची कसोटी मालिका निर्णायक ठरल्याचं सांगितलं. या मालिकेमुळे मला माझ्या चुका दुरुस्त करता आल्याचंही अश्विनने स्पष्ट केलं. इंग्लंडने टीम इंडियावर तेव्हा 2-1 ने मालिका विजय मिळवला होता. अश्विनने पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले.
“माझ्यासाठी ही मोठा क्षण आहे. या 100 व्या सामन्यामुळे माझ्या सरावात कोणताच बदल झालेला नाही. आम्हाला कसोटी सामना जिंकायचा आहे.”, असं अश्विनने म्हटलं. तसेच माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम स्पेल हा बर्मिंगघममध्ये 2018-19 साली इंग्लंड विरुद्ध आला असल्याचंही अश्विनने म्हटलं.
आपल्या देशासाठी खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मात्र देशासाठी 100 कसोटी सामने खेळणं ही खेळाडूसाठी अभिमास्पद बाब असते. मात्र आतापर्यंत मोजक्याच खेळाडूंना 100 कसोटी सामन्यांचा टप्पा पार करणं किवा गाठता आला आहे. त्यापैकी एक म्हणजे टीम इंडियाचा अश्विन. अश्विनने या ऐतिहासिक क्षणाबाबतही प्रतिक्रिया दिली.
दरम्यान आर अश्विनने आपल्या कसोटी कारकीर्दीत 99 सामने खेळले आहेत. अश्विनने या 99 कसोटी सामन्यांमध्ये 507 विकेट्स घेतल्या आहेत. अश्विनने विकेट्स घेण्यासह बॅटिंगने धमाकाही केला आहे. अश्विनने कसोटीमध्ये 3 हजार 309 धावा केल्या आहेत. तसेच अश्विनने 14 अर्धशतकं आणि 5 शतकं ठोकली आहेत.
अश्विन काय म्हणाला?
A special landmark awaits R Ashwin in Dharamsala & his eyes are set on powering #TeamIndia to a win 👌 👌#INDvENG | @ashwinravi99 | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/te9gpBCiDK
— BCCI (@BCCI) March 5, 2024
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.
टेस्ट सीरजसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, ऑली रॉबिन्सन, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, डॅनियल लॉरेन्स आणि गेस ऍटकिन्सन.