मुंबई : पाचव्या कसोटी सामना जिंकून शेवट गोड करण्याचा इंग्लंडचं स्वप्न भंगलं आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडने बेझबॉलची हवा केली होती. पण उर्वरित चार सामन्यात बेझबॉलची हवा गूल झाली. टीम इंडियाने नवोदित खेळाडूंच्या जोरावर ही मालिका जिंकली. दिग्गज खेळाडू नसताना टीम इंडियाने इंग्लंडला पराभवाचं पाणी पाजलं. इंग्लंडने पहिल्या सामन्यात 28 धावांनी विजय मिळवला. पण त्यानंतर टीम इंडियाने डोकंच वर काढू दिलं नाही. या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स चांगलाच संतापला आहे. त्याने या पराभवाचं कारण सांगताना खेळाडूंच कान टोचले आहेत. “या मालिकेतील पराभवाचं मोठं कारण म्हणजे संधीचा योग्य फायदा न घेणे.”, असं त्याने एका वाक्यात सांगितलं. त्यानंतर संघातील खेळाडूंना खडे बोल सुनावले. खेळाडूंची स्तुती करताना काय काय चुका झाल्या याचा पाढा वाचला. आम्ही एका चांगल्या संघाकडून मालिका गमवल्याचंही बेन स्टोक्सने सांगितलं.
“आम्ही एका चांगल्या संघाकडून मालिका हरल. येथून पुढे आम्हाला बरंच क्रिकेट खेळायचं आहे. त्यामुळे आता आमचं लक्ष आता तिकडे आहे. संपूर्ण मालिका पाहाल तर आम्हाला संधीचं सोनं करता आलं नाही. आम्ही वैयक्तिकरित्या जाणतो की, चुका नेमक्या कुठे केल्या ते. जेव्हा भारतीय गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात तेव्हा जवळपास सर्वच खेळाडू फिल्डिंग करताना दिसतात. त्यामुळे धावा करण्यासाठी नवीन मार्ग शोधणं गरजेचं आहे. अशात तुम्ही धोका पत्कारला तर तुमच्या बाजूने किंवा विरोधात जाऊ शकतो.”
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने खेळाडूंना सुनवताना काही जणांचं कौतुकही केलं, ‘झॅक क्राउली आणि बेन डकेटने चांगली ओपनिंग केली. बशीर आणि हार्टलीने पूर्ण मालिकेत चांगली कामगिरी केलीय. तर जो रुटचा फॉर्म परतणं हे आमच्या शुभ संकेत आहेत. जेम्स अँडरनसोबत फिल्डवर वेळ घालवणं एक चांगली अनुभूती आहे. एका वेगवान गोलंदाजाने 700 गडी बाद करणं अद्भूत आहे. त्याच्यासारखा फिट खेळाडू मी अद्याप पाहिला नाही.’