IND vs ENG : 100 व्या कसोटी सामन्यापूर्वी आर अश्विनने व्यक्त केलं दु:ख, वेदनांना करून दिली मोकळी वाट

| Updated on: Mar 05, 2024 | 4:25 PM

भारत इंग्लंड यांच्यातील पाचवा सामना धर्मशाळा येथे होणार आहे. आर अश्विनच्या कसोटी कारकिर्दितील हा 100 वा सामना आहे. भारतासाठी 100 वी कसोटी खेळणारा आर अश्विन हा 14 वा खेळाडू आहे. या प्रवासात आर अश्विनला एक बाब कायम खटकली. त्याने याबाबत आपलं दु:ख व्यक्त केलं.

IND vs ENG : 100 व्या कसोटी सामन्यापूर्वी आर अश्विनने व्यक्त केलं दु:ख, वेदनांना करून दिली मोकळी वाट
IND vs ENG : 100 व्या कसोटी सामन्यापूर्वी आर अश्विनच्या मनात कोणती सळ? स्वत:च सांगितलं सर्वकाही
Follow us on

मुंबई : भारत इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना धर्मशाळेत होत आहे. मालिकेत भारताने 3-1 ने आघाडी घेतली आहे. दुसरीकडे, आर अश्विन आपल्या कसोटी कारकिर्दितला 100 वा सामना खेळणार आहे. भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणारा आर अश्विन हा 14 वा भारतीय खेळाडू ठरणार आहे. आर अश्विनने 2010 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं आणि 2011 मध्ये पहिला कसोटी सामना खेळला होता. कसोटी क्रिकेटमध्ये आर अश्विनने 500 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. पण इतकं सर्व मिळवूनही आर अश्विनच्या मनात एक सळ कायम आहे. त्याने सांगितलं की, यश जितकं साजरं करायला हवं तितकं करता येत नाही. आर अश्विनने जिओ सिनेमा आणि स्पोर्ट्स 18 च्या एक्सपर्ट अनिल कुंबळे याच्याशी चर्चा केली. कुंबळेने प्रश्न विचारताना अनेक गुगली टाकले. अश्विनला विचारलं की, प्रत्येक दौऱ्यानंतर कोणशी चर्चा करतो? जर योग्य झाल्या तरी आणि नाही झाल्या तरी? या प्रश्नाला आर अश्विनने त्याच्या शैलीत उत्तर दिलं.

“मी एका व्यक्तीकडे जातो आणि ते त्याच्यासाठी खूपच तणावपूर्ण असते. ती व्यक्ती मी स्वत: आहे. कारण मला वाटतं की क्रिकेट सर्वात जास्त आत्मविचार करणाऱ्या खेळांपैकी एक आहे. जर तुम्ही स्वत:बाबत प्रामाणिक आहात आणि तितकीच स्वत:वर टीका करत असाल तर मला वाटतं की त्यातून सत्य बाहेर येतं. भारतात असे बरेच टीकाकार आहेत. जे तुम्हाला त्यापैकी 10 चुकीच्या गोष्टी सांगतील, पण ते निश्चितपणे टीकात्मक असेल. पण त्यापैकी 10 जण तुम्हाला योग्य गोष्टीही सांगतील. “, असं आर अश्विनने सांगितलं.

“माझं सर्वात मोठं दु:ख असं की मी माझं यश साजरं करत नाही. पण त्यातून मला एक चांगला क्रिकेटपटू बनण्यास मदत होते. मी कायम चुका सुधारण्यासाठी प्रयत्न केला आहे. आपण काय करू शकतो याचा मी कायम विचार केला आहे. उदाहरणार्थ सांगायचं तर, स्टीव्ह स्मिथने माझ्याविरुद्ध शतक केले तर मी त्याला कसं बाद करू शकतो. जो रूटला कसं जाळ्यात अडकवू शकतो या गोष्टी मला सतत नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा देतात. त्याचा फायदा मला काही वर्षात झाला आहे.”, असं आर अश्विन याने सांगितलं.

खरं तर तुझे 100 कसोटी सामने आधीच पूर्ण व्हायला हवे होते? असा प्रश्न कुंबळेने आर अश्विनला विचारला. त्यावर उत्तर देताना म्हणाला की, “भारतीय संघ इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, न्यूझीलंड येथे जातो तेव्हा पुरेशा संधी मिळत नाही. फलंदाज कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेतात. पण गोलंदाज म्हणून तुमच्या क्षमतेवर संशय असतो.” तुला काय वाटते असा प्रश्न लगेच कुंबळेने विचारला, त्यावर अश्विन म्हणाला, “मला कोणत्याही वादात पडायचं नाही. मी जगात घडणाऱ्या अनेक गोष्टींशी त्याची तुलना करू शकतो. मला वाटतं की गोलंदाज फलंदाजांसाठी दुय्यम भूमिका बजावतात.”