बीसीसीआय निवड समितीची आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पार्श्वभूमीवर 11 जानेवारीला बैठक पार पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची घोषणा करण्यासाठी 12 जानेवारी ही अंतिम मुदत आहे. सोबतच टीम इंडियाला त्याआधी मायदेशात इंग्लंडविरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिजही खेळायची आहे. या दोन्ही मालिकांसाठीही टीम इंडियाची घोषणा होणं बाकी आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निवड समितीकडून आयसीसी चॅम्पिन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेतून काही खेळाडूंना विश्रांती देण्यात येऊ शकते.
जसप्रीत बुमराहला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात सिडनीत दुखापत झाली.त्यामुळे बुमराहला चॅम्पिन्स ट्रॉफीपर्यंत पूर्णपणे फिट होण्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही मालिकेतून बाहेर ठेवलं जाऊ शकतं. तसेच मोहम्मद सिराज यालाही विश्रांती देण्यात येऊ शकते. तसेच शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही युवा फलंदाजांनाही ब्रेक देण्यात येऊ शकतो. या चौघांचा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत समावेश करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं टी 20i मालिकेत नेतृत्व करणार असल्याचं निश्चित आहे. हार्दिक पंड्या आणि आणि अक्षर पटेल ही ऑलराउंडर जोडी खेळताना दिसू शकते. तसेच ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन, रिंकु सिंह, तिलक वर्मा, वरुण चक्रवर्ती, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंह, यश दयाल आणि हर्षित राणा यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन
दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई
तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट
चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे
पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई,वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकीपर), प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंह, यश दयाल, रमनदीप सिंह, अभिषेक शर्मा आणि हर्षित राणा.