मुंबई : दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडसमोर 398 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान टीम इंडिया रोखणार का? इथपासून सुरुवात होती. कारण इंग्लंडच्या बेझबॉलने काय होईल काय सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येक विकेट टीम इंडियासाठी महत्त्वाचा होता. इंग्लंडचा प्रत्येक खेळाडू आपल्या परीने दुसऱ्या डावात मौल्यवान साथ देताना दिसत होता. त्यामुळे टीम इंडियापुढे झटपट गडी बाद करण्याचं आव्हान होतं. त्याने पहिल्याच जोडीने 50 धावांची भागीदारी केली होती. त्यामुळे चौथा दिवस कोणाच्या नावावर असेल हा प्रश्न होता. दुसरा गडी 92 धावांवर, तिसरा गडी 132 धावांवर, चौथा गडी 154 धावांवर, पाचवा गडी 194 धावांवर आणि सहावा गडी 220 धावांवर गेला. पण सहावा गडी बाद झाला तेव्हा टीम इंडियाच्या जीवात जीव आला होता. कारण बेन स्टोक्सची विकेट स्वस्तात मिळणं खूपच कठीण होतं. पण श्रेयस अय्यरच्या एका थ्रोने सामन्याचं चित्रच पालटलं.
बेन स्टोक्सवर मधल्या फळीचा खेळ पुढे नेण्याची जबाबदारी होती. त्यासाठी त्याने मैदानात पाय रोवले. तसेच एक चौकार मारत आपला अंदाजही दाखवून दिला. . पण बेन फोक्सला श्रेयस अय्यरच्या दिशेने चेंडू मारून धाव घेणं महागात पडलं. त्याच्या त्या चुकीमुळे बेन स्टोक्सला विकेट गमवावी लागली. खरं तर ही धाव सहज शक्य होती. पण श्रेयस अय्यरने चपळता दाखवत स्ट्राईकला स्टंपवर नेम घेऊन चेंडू फेकता आणि तसंच झालं. बेन स्टोक्स धावचीत झाला.
What a throw by shreyas Iyer 🤯#INDvENG pic.twitter.com/hR3ecZEzm8
— Virat Kohli Fan Army (@ajeetyadav018) February 5, 2024
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मुकेश कुमार
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन