मुंबई | क्रिकेट टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20, वनडे आणि टेस्ट सीरिज होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्यांदात द्विपक्षीय टी 20 मालिका खेळणार आहे. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंड वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. विंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिका पार पडली आहे. त्यानंतर विंडिज विरुद्ध इंग्लंड 12 डिसेंबरपासून 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर इंग्लंड टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात उभयसंघात कसोटी मालिका होणार आहे. इंग्लंडने या टेस्ट सीरिजसाठी 16 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. आयसीसी एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे.
टीम इंडिया-इंग्लंड यांच्यात एकूण 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. तर 11 मार्चला मालिकेतील अखेरच्या सामन्यातील अखेरचा दिवस असणार आहे. बेन स्टोक्स हा इंग्लंडचं नेतृ्त्व करणार आहे. इंग्लंडने या सीरिजसाठी टॉम हार्टली, गेस एटकिन्सन आणि शोएब बशीर यांची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे. तसेच रेहान अहमद याचं कमबॅक झालंय. तर बेन फोक्स याचंही संघात पुनरागमन झालंय. फोक्स एशेस सीरिजमधून बाहेर पडला होता. तसेच ओली पोप आणि जॅक लीच हे देखील दुखापतीनंतर परतले आहेत. तर ख्रिस वोक्स, लियाम डॉसन आणि विल जॅक्स या तिघांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
पहिला सामना, 25 ते 29 जानेवारी 2024, राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद.
दुसरा सामना, 2 ते 6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम.
तिसरा सामना, 15 ते 19 फेब्रुवारी, सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियम, सौराष्ट्र.
चौथा सामना, 23 ते 27 फेब्रुवारी, जेएससीए स्टेडियम, रांची.
पाचवा सामना, 7 ते 11 मार्च, एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला.
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ जाहीर
Four spinners will lead England’s charge in the #WTC25 series in India next year 👀
Squad details 👇https://t.co/ofsVK9M2vw
— ICC (@ICC) December 11, 2023
टीम इंडिया विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ | बेन स्टोक्स (कॅप्टन) , रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो, शोएब बशीर, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.