मुंबई : भारत इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशीच्या पहिल्या सत्रात इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला. या सामन्यातून डेब्यू करणाऱ्या आकाशदीपने इंग्लंडला सळो की पळो करून सोडलं. जसप्रीत बुमराहची उणीव त्याने भासू दिली नाही. पहिल्या सत्रात इंग्लंडच्या 3 फलंदाजांना तंबूत पाठवलं. झॅक क्राउले, बेन डकेट आणि ओली पोप या आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. पण करिअरमध्ये घेतलेली पहिली विकेट वाया गेली. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीने सामन्याला सुरुवात झाली. त्यानंतर सामन्यातून डेब्यू करणाऱ्या आकाशदीपला षटक सोपवलं गेलं. राईट आर्म मीडियम वेगवाने षटक टाकणाऱ्या आकाशदीपने पहिल्या षटकात दोन धावा दिल्या. पण विकेट काही हाती लागली नाही. संघाचं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक पुन्हा एकदा आकाशदीपकडे आलं. या षटकात त्याने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकले. क्राउलेने तिसऱ्या चेंडूवर धाव घेतली आणि डकेटला स्ट्राईक दिली. चौथ्या चेंडूवर डकेटने एक धाव घेत क्राउलेला स्ट्राईक दिली.
पाचवा चेंडू हा आकाशदीपच्या करिअरमधील बेस्ट चेंडू ठरू शकला असता. पण दुर्दैवाने तसं झालं नाही. झॅक क्राऊलेचा त्रिफलळा उडवताच आनंद साजरा केला गेला. पण पंचांनी नो बॉल घोषित करताच त्यावर विरजण पडलं. त्यामुळे दुसरं षटकंही विकेटविना वाया गेलं. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या षटकातही काही खास करू शकला नाही. पण पाचव्या षटकात इंग्लंडला बॅकफूटला ढकललं.
No ball from Akash Deep denies him his first Test wicket! #INDvENG #INDvsENG pic.twitter.com/vQyRTmj4aY
— 🏏Flashscore Cricket Commentators (@FlashCric) February 23, 2024
पाचव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डकेटला विकेटकीपर ध्रूव जुरेलच्या हाती झेल सोपवून तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर ओली पोपला खातंही खोलू दिलं नाही. पायचीत करत करिअरमधली दुसरी विकेट घेतली. तसेच सहाव्या षटकात पहिल्या विकेटचं ऋणही फेडलं. क्राऊलीला क्लिन बोल्ड करत हिशेब चुकता केला.
Flying Stumps but unfortunately it is Big No Ball 🏀.#INDvENG#akashdeeppic.twitter.com/RSD5uXlkv3
— Asif (@immam21) February 23, 2024
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कर्णधार) झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेयरस्टो, बेन फोक्स, टॉम हार्टले, ओली रॉबिन्सन, जेम्स एंडरसन आणि शोएब बशीर.