मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची मालिका ही सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा 15 ते 19 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे खेळवण्यात येणार आहे. त्याआधी बीसीसीआयने उर्वरित 3 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. पहिल्या 2 सामन्यानंतर उर्वरित मालिकेतूनही विराट कोहली हा वैयक्तिक कारणामुळे बाहेर पडला आहे. दुखापतीनंतर रवींद्र जडेजा आणि केएल राहुल या दोघांची एन्ट्री झाली आहे. मात्र या दोघांची निवड फिटनेस टेस्टवर अवलंबून असणार आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्याला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे.
इंग्लंड क्रिकेट टीमला मोठा झटका लागला आहे. इंग्लंडचा स्टार खेळाडू हा दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. इंग्लंडचा स्पिनर जॅक लीच हा सीरिजमधून बाहेर झाला आहे. जॅक लीच याला हैदराबाद कसोटी सामन्यात गुडघ्याला दुखापत झाली होती. लीचला याच दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातही खेळता आलं नाही. आता अखेर तो बाहेर झाला आहे.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून दिलेल्या माहितीनुसार, जॅक लीच पुढील 24 तासांमध्ये इंग्लंडला रवाना होईल. त्यानंतर जॅक लीच आपल्या दुखापतीवर मेहनत घेईल. तर इंग्लंड क्रिकेट टीमने जॅक लीचच्या जागी बदली खेळाडूचं नाव जाहीर केलेलं नाही. जॅक लीच याने आपल्या कसोटी कारकीर्दीत आतापर्यंत 36 कसोटी सामन्यांमध्ये 126 विकेट्स घेतल्या आहेत.
इंग्लंड क्रिकेट टीमला मोठा झटका
🚨 JUST IN: England have been hit with a big injury blow in the Test series against India.#WTC25 | #INDvENGhttps://t.co/SrNOynwWu5
— ICC (@ICC) February 11, 2024
शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा (फिटनेसवर अवलंबून).
इंग्लंड क्रिकेट टीम | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.