मुंबई : तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने जबरदस्त कामगिरी केली होती. बेझबॉल रणनितीने भारतीय गोलंदाजांची पिसं काढली होती. 2 बाद 207 असा पल्ला गाठला होता. त्यामुळे भारताने केलेल्या 445 धावांचा पल्ला सहज गाठेल असं वाटत होतं. पण तिसऱ्या दिवशी सर्व फासे उलटे पडले. 112 धावांवर 8 गडी बाद झाले. तर इंग्लंडच्या संपूर्ण संघाला 319 धावा करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाकडे 126 धावांची आघाडी राहिली. पहिल्या डावात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीची जादू दिसली. चार खेळाडूंना बाद करत टीम इंडियाला कमबॅक करून दिलं. त्यामुळे मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीचं कौतुक होत आहे. चार पैकी दोन जणांचा त्रिफळा सिराजने उडवला. परफेक्ट यॉर्करचं दर्शन त्याने घडवलं. रेहान अहमद आणि जेम्स अँडरसन यांना क्लिन बोल्ड करत तंबूचा रस्ता दाखवला. मोहम्मद सिराजने 21.1 षटक टाकली. त्यात 2 षटकं निर्धाव टाकली. 84 धावा देत दोन गडी बाद केले.
कर्णधार रोहित शर्मा याने 70 वं षटक मोहम्मद सिराजच्या हाती सोपवलं. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रेहान अहमदच्या बरोबर बुंद्यात चेंडू टाकला. त्यामुळे त्याला कसा शॉट खेळावा हे कळलंच नाही. काही कळायच्या आतच त्याचा त्रिफळा उडाला होता. रेहान अहमदने 13 चेंडूत 6 धावा केल्या. त्यानंतर 72 व्या षटकात समोर जेम्स अँडरसन आला. मग काय त्याच्यासमोरही यॉर्कर अस्त्र काढलं. पहिल्याच चेंडूवर जेम्स अँडरसनला बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. यॉर्करपुढे जेम्स अँडरसनचं काहीच चाललं नाही. त्यामुळे त्याला एका धावेवर समाधान मानून परतावं लागलं.
𝗔𝗹𝗹 𝘁𝗮𝗿𝗴𝗲𝘁𝘀 🎯𝗱𝗲𝘀𝘁𝗿𝗼𝘆𝗲𝗱 🚀☝️
Siraj wraps up the England innings with finesse 🔥👏#INDvENG #JioCinemaSports #BazBowled #IDFCFirstBankTestSeries pic.twitter.com/WOO1DRVDHE
— JioCinema (@JioCinema) February 17, 2024
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जेम्स अँडरसन