IND vs ENG : रवींद्र जडेजाने गिरवला शुबमन गिलचा कित्ता! आर अश्विनचा डाव एका झटक्यात आटोपला

| Updated on: Jan 26, 2024 | 4:54 PM

भारत इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे. दुसरा दिवसही भारताच्या नावावर राहिला. इंग्लंडने केलेल्या 246 धावांचा पल्ला भारताने सहज गाठला आहे. तसेच 150 च्या पार आघाडी घेतली आहे. पण या सामन्यात आर अश्विन विचित्र पद्धतीने आऊट झाला. प्रत्येकाला यावेळी रोहित-गिलचा प्रसंग आठवला.

IND vs ENG : रवींद्र जडेजाने गिरवला शुबमन गिलचा कित्ता! आर अश्विनचा डाव एका झटक्यात आटोपला
Follow us on

मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु असून दुसऱ्या दिवशी भारताची मजबूत पकड मिळवली आहे. इंग्लंडने केलेल्या 245 धावांचा पल्ला गाठून मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही आघाडी मोठी विजयासाठी धावा देण्याचं आव्हान इंग्लंडसमोर असणार आहे. पहिल्या दिवशी टीम इंडियाने रोहित शर्माच्या रुपाने एक गडी गमावला होता. मात्र दुसऱ्या दिवशी 120 धावांवरून पुढे खेळताना पहिल्याच षटकात यशस्वी जयस्वाल तंबूत परतला. 74 चेंडूत 80 धावा करून तंबूरत परतला. त्यानंतर शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर काही खास करू शकला नाही. केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला आहे. केएल राहुलचं शतक अवघ्या 14 धावांनी हुकलं. तर श्रीकरने जडेजाला चांगली साथ दिली. पण 41 धावांवर तंबूत परतला. इथपर्यंत सर्वकाही ठिक होतं आणि फलंदाजीसाठी आर अश्विन आला. मात्र त्याला अवघी 1 धाव करून तंबूत परतावं लागलं.

टीम इंडियाच्या 356 धावा असताना आर अश्विन जडेजाची साथ देण्यासाठी मैदानात उतरला. त्याने एक धाव घेतल्याने स्ट्राईक त्याच्याकडेच होता. त्यानंतर दुसऱ्या षटकात तिसऱ्या चेंडूवर माघारी परतावलं लागलं. जो रुटच्या गोलंदाजीवर आर अश्विनने मिड ऑफला चेंडू मारला आणि धाव घेतली. ती सोपी धाव होती. त्यामुळे आर अश्विनने नॉन स्ट्राईकला धावा घेतली. पण जडेजाने कॉल घेऊनही मागे परतला. त्यामुळे आर. अश्विनला धावचीत व्हावं लागलं. अश्विन रनआऊटमुळे चांगलाच वैतागला होता. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सर्व काही सांगत होते.

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात असंच चित्र पाहायला मिळालं होतं. शुबमन गिलने कॉल व्यवस्थित न घेतल्याने रोहितला धावचीत होत तंबूत परतावं लागलं. यावेळी रोहित शर्माने मैदानातच आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यामुळे शुबमनचा कित्ताच जडेजाने गिरवल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. दुसरीकडे, सात वर्षांपूर्वी जडेजा आणि अश्विनमधला असाच विसंवाद झाला होता.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (कर्णधार), बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड, जॅक लीच