नवी दिल्ली : इंग्लंड विरुद्धच्या (IND vs ENG) कसोटी सामन्यात कर्णधार म्हणून रोहित शर्माची (Rohit Sharma) उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. टीम इंडियाने दुसऱ्या टी-20 (T-20) सामन्यात इंग्लंडचा 49 धावांनी पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या सामन्यात ऋषभ पंत रोहित शर्मासोबत सलामीला आला. पंतला प्रथमच सलामीवीर म्हणून संधी मिळाली. पंतनेही 15 चेंडूत 26 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम खेळताना 8 विकेट गमावत 170 धावा केल्या. रवींद्र जडेजाने नाबाद 46 धावा करत संघाला संघर्षपूर्ण धावसंख्येपर्यंत नेले. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 121 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताने इंग्लंडमध्ये सलग दुसरी द्विपक्षीय T20 मालिका जिंकली आहे. कालच्या सामन्यात विराटची कामगिरी मात्र अत्यंत निराशजनक होती. त्यामुळे देखील तो चर्चेचा विषय ठरला. दरम्यान, ऋषभनं थेट इंग्लंडच्या गोलंदाजाला टक्कर मारू का असं रोहितला विचारलं आणि या व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.
कालच्या सामन्यात रोहित शर्मा आणि ऋषभ पंत सलामीला आले. इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड विली डावातील पहिले षटक टाकत होता. तिसऱ्या चेंडूवर ऋषभ पंत शॉर्ट मिडविकेटवर शॉट खेळून धावू लागला. जरी तो थेट थ्रोवर धावबाद होऊ शकला असता. यादरम्यान त्याने रोहितला सांगितले की, गोलंदाज समोर आला आहे. मी मारू का? यावर कॅप्टन रोहित शर्मा म्हणाला, हो आणि काय. दोघांमधील संवादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Rishabh Pant asking ” takkar mardu kya” ??❤️ pic.twitter.com/4I4bIEx0ZJ
— time square ?? (@time__square) July 9, 2022
173च्या स्ट्राईक रेटन केलेल्या सामन्यात इशान किशनला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले नाही . रोहित आणि ऋषभ पंत सलामीला आले. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 4.5 षटकांत 49 धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. पंतने 15 चेंडूत 173 च्या स्ट्राईक रेटने 26 धावा केल्या. 4 चौकार आणि 1 षटकार मारला. त्याचवेळी रोहितने 20 चेंडूत 31 धावा केल्या. 3 चौकार आणि 2 चौकार मारले. मात्र, यानंतर संघाची त्रेधा उडाली आणि धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यात 61 अशी झाली.
रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा हा T20 मध्ये सलग 14 वा विजय आहे. त्याने शेवटच्या सामन्यातच सलग 13 विजय नोंदवण्याचा विश्वविक्रम केला आहे. नवा कर्णधार झाल्यापासून रोहितने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज होणार आहे. अशा स्थितीत त्याची नजर क्लीन स्वीपवर असेल.