IND vs ENG : रोहित-धवनची यारी इंग्लंडवर पडणार भारी, जुनी मैत्री इंग्लंडला रोखणार? आजच्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा

| Updated on: Jul 12, 2022 | 8:32 AM

आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी सलामीला येईल. धवन जरी T20 संघाचा भाग नसला तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे संघाचं कर्णधार बनवण्यात आलं आहे.

IND vs ENG  : रोहित-धवनची यारी इंग्लंडवर पडणार भारी, जुनी मैत्री इंग्लंडला रोखणार? आजच्या सामन्याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा
शिखर धवन, रोहित शर्मा
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली :  आजपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या (ENG) एकदिवसीय मालिकेत (IND vs ENG) भारताला (IND) चांगलं खेळायचं आहे.  नवा कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) आतापर्यंत एकही मालिका गमावलेली नाही. यातच आजच्या सामन्याकडे क्रिकेट प्रेमींचं विशेष लक्ष असणार आहे. कारण, आज रोहित शर्मा आणि शिखर धवन (Shikhar Dhawan) हे दोघे जुने मित्र एकत्र खेळणार आहे.  यामुळे आता हे दोन्ही खेळाडू इंग्लंडला भारी पडणार असं बोललं जातंय.  याआधी संघानं टी-20 मालिका 2-1 अशी जिंकली होती. मात्र, सामन्यापूर्वी संघाला मोठा धक्का बसला. माजी कर्णधार विराट कोहलीचे दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळणं साशंक आहे. मात्र, युवा खेळाडूंनी टी-20 मालिकेत ज्या प्रकारे कामगिरी केली. त्यामुळे संघ व्यवस्थापन खूश आहे. दुसरीकडे इंग्लिश कर्णधार जोस बटलरला टी-20 मालिकेतील खराब फॉर्ममधून सावरण्याची इच्छा आहे. इयॉन मॉर्गनच्या जागी त्याला संघाची कमान मिळाली आहे.

…तर सचिनच्या विक्रमाची बरोबरी

आजच्या सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी सलामीला येईल. धवन जरी T20 संघाचा भाग नसला तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी वनडे संघाचं कर्णधार बनवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना येथे चांगली कामगिरी करायला आवडेल. रोहित आणि धवन ही जोडी भारताची वनडेतील दुसरी सर्वात यशस्वी सलामीची जोडी आहे. आज जर त्यांनी 65 धावांची भागीदारी केली तर ते सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या विक्रमाची बरोबरी करतील.

सचिन-गांगुलीच्या जोडीची कमाल

सचिन आणि गांगुलीच्या जोडीने एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून 6609 धावांची भागीदारी करून 5000 धावांचा टप्पा गाठला आहे. यादरम्यान त्याने 21 शतके आणि 23 अर्धशतकांच्या भागीदारी केल्या आहेत. रोहित आणि धवनने आतापर्यंत सलामीची जोडी म्हणून 4994 धावांची भागीदारी केली आहे. अशा स्थितीत या दोघांनीही आज 500 धावांची भागीदारी केल्याने ते 5 हजार धावांच्या विक्रमाला हात घालतील. म्हणजेच ते सचिन आणि गांगुलीच्या 5 हजार धावांच्या विक्रमाची बरोबरी करतील. 111 डावांमध्ये या दोघांनी आतापर्यंत 17 शतके आणि 15 अर्धशतकांची भागीदारी केली आहे.

शिखर धवनचा ओव्हल मैदानावरचा विक्रमही उत्कृष्ट आहे. त्याने आतापर्यंत 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये 111 च्या सरासरीने 443 धावा केल्या आहेत. त्याने 3 शतके आणि एक अर्धशतक झळकावले आहे. 125 धावांची सर्वोच्च खेळी. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा संघाला त्याच्याकडून मोठ्या आशा आहेत. त्याचवेळी रोहित शर्माने 5 सामन्यात 40 च्या सरासरीने 199 धावा केल्या आहेत. 3 अर्धशतके केली आहेत. रोहितची इंग्लंडमध्ये एकूण कामगिरी चांगली आहे. त्याने येथे 24 एकदिवसीय सामन्यांमध्ये 7 शतके झळकावली आहेत. परदेशी फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके करणारा तो खेळाडू आहे. 140 धावांची सर्वोत्तम खेळी.