आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात गतविजेता इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया आमनेसामने असणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर जॉस बटलर इंग्लंडची कॅप्टन्सी करणार आहे. दोन्ही संघ 2022 नंतर पुन्हा एकदा सेमी फायनलमध्ये भिडणार आहेत. इंग्लंडने 2022 साली टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये पराभव केला होता. त्यामुळे आता टीम इंडियाकडे 2 वर्षांचा हिशोब क्लिअर करुन फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. तर इंग्लंड पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहचण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे या सामन्यात क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सेमी फायनल सामना गुरुवारी 27 जून रोजी होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना हा प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना टीव्हीवर डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड सामना मोबाईलवर डिज्ने प्लस हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
इंग्लंड क्रिकेट टीम: जोस बटलर (कॅप्टन), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, सॅम करन, बेन डकेट, टॉम हार्टले, विल जॅक्स, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, फिलिप सॉल्ट, रीस टोपले आणि मार्क वुड.