आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे गयाना येथील प्रोव्हिडेन्स स्टेडियम येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला नियोजित वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणं अपेक्षित होतं. मात्र सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे विलंबाने काही होईना अखेर टॉस झाला आहे. इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन जॉस बटलर याने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात एकूण 23 टी 20आय सामने झाले आहेत. टीम इंडियाने इंग्लंडच्या तुलनेत 1 सामना जास्त जिंकला आहे. टीम इंडियाने 13 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 12 वेळा विजय मिळवला आहे. तर टी 20 वर्ल्ड कप इतिहासात दोन्ही संघांची आकडेवारीही बरोबरीची आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना चुरशीचा सामना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.
दरम्यान टीम इंडियाची ही सेमी फायनलमध्ये पोहचण्याची पाचवी वेळ आहे. तर इंग्लंडची ही एकूण आणि सलग पाचवी तसेच टीम इंडिया विरुद्ध सेमी फायनलमध्ये खेळण्याची सलग दुसरी वेळ आहे. इंग्लंडने टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कप 2022 सेमी फायनलमध्ये पराभव केला होता. त्यामुळे आता टीम इंडियाकडे त्या पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे.
इंग्लंडने टॉस जिंकला
🚨 Toss News
England have elected to bowl against #TeamIndia in the #T20WorldCup Semi-Final.
Follow The Match ▶️ https://t.co/1vPO2Y5ALw#INDvENG
📸 ICC pic.twitter.com/y1lNkCBJI3
— BCCI (@BCCI) June 27, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर), फिलिप सॉल्ट, जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि रीस टोपले.